घरCORONA UPDATECorona Live Update: गोव्यात आज दिवसभरात २१५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

Corona Live Update: गोव्यात आज दिवसभरात २१५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद!

Subscribe

गोव्या आज २१५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोव्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजार ७०४वर पोहोचला आहे. यापैकी आथापर्यत ४ हजार ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ हजार ६५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार २२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १३ हजार १८७वर पोहोचला असून यापैकी ६ हजार २९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


ठाण्यात आज २७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १० जणांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच आज ४०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ठाण्यात मृतांचा आकडा हा ६०८वर पोहोचला असून आतापर्यंत १३ हजार ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ हजार ७९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात आज ११ हजार १४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २६६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ११ हजार ७९८वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत १४ हजार ७२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


पश्चिम उपनगरात गेल्या दोन दिवसांत ७०० पोलिसांचे रॅपिट अँटीजेन डिटेक्शन चाचणी करण्यात आली असून त्यात २२ पोलिसांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी काही पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या काही दिवसांत पोलिसांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. मध्य मुंबईत महानगरपालिकेच्या मदतीने पोलिसांनी रॅपिट अँटीजेन डिटेक्शन चाचणी घेण्यास सुरुवात केली होती. तशी चाचणी गेल्या दोन दिवसांत पश्चिम उपनगरातील काही पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती. सातशेहून अधिक पोलिसांची चाचणी घेतल्यानंतर बावीस जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. काही पोलिसांना सौम्य लक्षणे दिसून आल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले तर काहींना तातडीने विविध खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच मुंबई शहरातील इतर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची रॅपिट अँटीजेन डिटेक्शन चाचणी होणार आहे.

धारावीत आज ६ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ५५१वर पोहोचला आहे. तसेच दादरमध्ये आज ४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा १ हजार ७३४वर पोहोचला आहे. तर माहिम आज १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण आकडा १ हजार ६७२ झाला आहे.


उत्तर प्रदेशातील अयोध्या येथून चिंताजनक बातमी समोर येत आहे. येथे राममंदिराच्या भूमीपूजनाच्या तयारी दरम्यान कोरोनाने शिरकाव केला आहे. याठिकाणी राम जन्मभूमीच्या पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. न्यूज १८ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रामजन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुख्य याजक आचार्य सत्येंद्र दास यांचे ते शिष्य असल्याचे सांगितले जात आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच

राज्यात सुरू होणाऱ्या मिशन बिगीन अगेनच्या पुढील टप्प्यात इनडोअर जिम, व्यायामशाळा बंदच राहणार आहेत. केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून ५ ऑगस्टपासून सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. या संबंधीचे पत्रक राज्य शासनाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारने काल सायंकाळी अनलॉक ३ सोबतच कटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठाकरे सरकारनेही लॉकडाऊनमध्ये वाढ केली. राज्य सरकारच्यावतीने यासंबंधीची नियमावली जाहीर करण्यात आली असून मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचे काही नियमदेखील यामध्ये शिथील करण्यात आले. नव्या नियमावलीनुसार बाईकवर दोन जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत सर्वाधिक ५२, १२३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली आहे. देशांत मागील २४ तासांत सर्वाधिक ५२ हजार १२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाख ८३ हजार ७९२ वर पोहोचला असून यापैकी ३४ हजार ९६८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख २८ हजार २४२ रुग्ण असून सध्या १ लाख २० हजार ५८२ रुग्णांनी कोरोनावप मात केली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.


देशभरात २४ तासांत ४ लाख ४६ हजार ६४२ जणांच्या कोरोना चाचण्या

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ४ लाख ४६ हजार ६४२ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


२४ तासांत राज्यात ९ हजार २११ नवे कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९ हजार २११ नवे कोरोनाबाधित आढळले असून २९८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार झाली आहे. तसेच राज्यात २४ तासांत ७ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ६५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून २ लाख ३९ हजार ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या राज्यात १ लाख ४६ हजार १२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्राने पेरु, चिली, स्पेन, ब्रिटन यासारख्या देशांना कोरोनाबाधितांच्या संख्येत मागे टाकले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -