घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: बिहार पोलिसांना मुंबईत तपासाचे अधिकार नाहीत - शंभूराजे देसाई

Sushant Suicide Case: बिहार पोलिसांना मुंबईत तपासाचे अधिकार नाहीत – शंभूराजे देसाई

Subscribe

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस अतिशय गांभीर्याने तपास करीत आहेत. पण बिहार पोलिसांना मुंबईत येऊन तपास करायचा असेल तर बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे नियमाप्रमाणे बिहार पोलिसांना मुंबईत येऊन तपासाचे अधिकार नाहीत असे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत तपास सुरु केला आहे. या संदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, या प्रकरणी काही लोकांचे जाबजबाब झाले आहेत. ज्यांचे जाबजवाब घेणे आवश्यक आहे त्यांचे जबाब पुढील काळात घेतले जातील.

बिहारमध्ये या प्रकरणी एक तक्रार दाखल झाली आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की बिहारमधील तक्रारीचा तपास करण्यासाठी त्या राज्यातील पोलिस चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. पण या संदर्भात एक नियमावली आहेत. एखाद्या राज्यातील पोलिसांना तपासासाठी दुस-या राज्यात जायचे असेल तर त्या राज्यातील पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. पण त्यांनी अशी परवानगी घेतलेली नाही ज्या प्रकरणाचा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत असताना पुन्हा वेगळा तपास करायचा हे योग्य नाही. असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या प्रकरणी बिहारमध्ये एफआयआर दाखल झाला असेल तर मुंबई पोलिस सहकार्य करतील का या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, एखाद्या घडलेली घटना आणि त्या राज्यात घटना घडल्यावर एफआयआर दाखल झाला तर तो ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी वर्ग करावा लागतो असा नियम आहे. म्हणून या नियमावलीचे बिहार पोलिसांनी पालन करावे. या प्रकरणी सुशांतसिंह राजपूत यांच्या नातेवाईक किंवा कुटुंबियांना अधिक माहिती द्यायची असले तर पुरवणी जबाब नोंदवता येईल असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -