घरमुंबईगणेशभक्तांनो रविवारी मुंबईत बिनधास्त फिरा; मध्य -हर्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

गणेशभक्तांनो रविवारी मुंबईत बिनधास्त फिरा; मध्य -हर्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

Subscribe

शहरातील गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी नोकरदारांनी अनेक मंडळांना भेट देण्याचे बेत आखले आहेत या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्याचा मेगाब्लॉक रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

शहरातील गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. शनिवार- रविवार सुट्टीच्या दिवशी नोकरदारांनी अनेक मंडळांना भेट देण्याचे बेत आखले आहेत या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने उद्याचा मेगाब्लॉक रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र, लोकलसेवा रविवार वेळापत्रकाप्रमाणे चालणार असल्यानं काही लोकल रद्द असणार आहेत. (Ganesha devotees roam freely in Mumbai on Sunday Megablock on Central Harbor Railway cancelled)

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण कसारा, कर्जत, हार्बर-ट्रान्सहार्बरसह बेलापूर-खारकोपर मार्गिकांवरील रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रकालीन बोरिवली ते भाईंदरदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी दिवसा मुंबई लोकलच्या कोणत्याही मार्गावर ब्लॉक असणार नाही. सोमवार ते शुक्रवार मध्य रेल्वेवर 1 हजार 810 लोकल फेऱ्या होतात. रविवारी सुट्टी असल्यानं तीनशेहून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे रविवारी 1 हजार 474 फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहेत.

- Advertisement -

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वे 24 सप्टेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण सेक्शन मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल हार्बर लाईनसह ट्रान्स-हार्बर लाईन आणि बी एसयू लाईन उपनगरीय सेक्शनवर कोणताही मेगाब्लॉक घेणार नाही, अशी मोहिती मध्य रेल्वेकडून ट्वीट करून दिली आहे.

पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉक नाही..

मध्य रेल्वेप्रमाणं पश्चिम रेल्वेवरही 24 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली आणि भाईंदर या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळ दुरुस्ती, देखभाल आणि ओव्हरहेड नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त ब्लॉक इथेही लागू नसणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा:अँटेलिया बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवण्यामागे सचिन वाझेचा होता ‘हा’ डाव; NIA न्यायालयानं नोंदवली निरिक्षणं )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -