घरमुंबईGautam Adani Meet Sharad Pawar: गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; सुप्रिया...

Gautam Adani Meet Sharad Pawar: गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; सुप्रिया सुळेही हजर, चर्चांना उधाण

Subscribe

अदानी उद्योग समूहाचे मालक गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी (सिल्व्हर ओक) भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

मुंबई: अदानी उद्योग समूहाचे मालक गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी (सिल्व्हर ओक) भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या भेटीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. (Gautam Adani Meet Sharad Pawar Gautam Adani met Sharad Pawar Supriya Sule also present sparks discussions Silver Oak Mumbai )

खरे तर काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाने धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चावर राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतुक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बारामतीतील टेक सेंटरच्या उभारणीसाठी 25 कोटी रुपयांच्या योगदानाबद्दल शरद पवार यांनी अदानी यांचे आभार मानले होते. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास गौतम अदानी ‘सिल्व्हर ओक'(शरद पवार यांचं निवासस्थान) वर पोहोचले.

- Advertisement -

शरद पवार यांनी अदानींचे केले कौतुक

एकीकडे इंडिया अलायन्समधील विरोधी पक्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेऊन मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी नेहमीच गौतम अदानींना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, राहुल गांधींच्या या मागणीला शरद पवारांनी विरोध केला. त्यामुळे भारत आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (शिवसेना)  गटांकडून अदानींना सतत लक्ष्य करूनही शरद पवार यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.

अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीने सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. या आधाही शरद पवार आणि गौतम अदानी यांची अनेकदा भेट झाली आहे. पण आता अदानींनी अचानक पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: BJP : हीच का तुमची तयारी? ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपाचा राहुल गांधी यांना सवाल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -