घरमुंबईउदानींना ब्लॅकमेल करण्यासाठी सचिनने लावला होता हनीट्रॅप

उदानींना ब्लॅकमेल करण्यासाठी सचिनने लावला होता हनीट्रॅप

Subscribe

सचिन पवारला आज हिरे व्यापारी हत्या प्रकरणात कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने सचिन पवारला १४ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घाटकोपर पूर्व येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या करण्याची कुठलीही योजना नव्हती, त्यांना ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून त्यांचा एका बारबाला सोबत नको त्या अवस्थेत व्हिडीओ काढून पैसे उकळण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र याचा सुगावा लागल्यामुळे उदानी यांची हत्या करण्यात आली असल्याचा धक्कादायक वृत्त समोर येत आहे. मात्र या बाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नसून आम्ही सर्व बाजू तपासून बघत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान या गुन्हयात अटक करण्यात आलेल्या सचिन पवार याला आज सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे.

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हे बेपत्ता झाल्यानंतर ७ दिवसानी त्यांचा मृतदेह पनवेल तालुका पोलिसांना नेरवाडी परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. ७ डिसेंबर रोजी पंतनगर पोलिसांनी आणि उदानी यांच्या नातेवाईकांनी मृत्यूदेहाची ओळख पटवून तो उदानी यांचाच असल्याची खात्री केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदानी यांच्या मोबाईल फोन नंबरची माहिती मिळवली असता त्यात भाजपचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार याचे १३ फोन कॉल मिळून आले होते. त्या अनुषंगावरून पंतनगर पोलिसांनी सचिन पवार याला ताब्यात घेऊन अटक केली होती. दरम्यान या गुन्हयाचा मास्टर माईंड हत्यारी विभागातील पोलीस शिपाई दिनेश पवार हा देखील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. मात्र दिनेश पवारला पंतनगर पोलिसांनी ७डिसेंबर रोजीच एका तरुणीची फसवणूक व अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली होती.

- Advertisement -

सचिन पवार हा ऑनबोर्ड नावाचे एक प्रोडक्शन हाऊस आहे, त्या प्रोडक्शन हाऊस मधून छोट्यामोठ्या जाहिरात, राजकीय जाहिरात करण्याचे काम सुरू असते. उदानी याच्याकडून सचिन पवार याने साडे तीन लाख उदारीवर घेतले होते, हे पैसे परत घेण्यासाठी उदानी यांनी सचिन पवारकडे तगादा लावला होता, मात्र उदानीला पैसे न देता त्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याला ब्लॅकमेल करण्याची योजना आखण्यात आली, त्यासाठी सचिन आणि दिनेश यांनी एका बारबालेला सोबत घेऊन त्या बारबाला सोबत उदणीला एका हॉटेल मध्ये पाठवून त्या बारबाला सोबत उदानीचा व्हिडीओ बनवून त्या मार्फत उदानीला ब्लॅकमेल करण्याची योजना आखण्यात आली होती. परन्तु मोटारीतून जाताना उदाणीसोबत हातापाय होऊन या मारहाणीत उदाणीचा मारला गेला. विशेष म्हणजे राजेश्वर उदानीची हरवल्याची तक्रार देण्यासाठी सचिन पवार हा स्वतः उदानीच्या मुलासोबत पोलीस ठाण्यात आला होता, त्यानंतर सचिन हा उदानीचा मुलाल घेऊन गुन्हे अन्वेषण शाखेत देखील गेला होता.उदानीचा शोध घेण्यासाठी सतत दोन दिवस उदानीच्या मुलासोबत फिरणाऱ्या सचिन पोलिसांची दिशाभूल करीत होता अशी माहिती समोर आली आहे

दरम्यान ,ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सचिन पवार नव्हता, तो त्या दिवशी घाटकोपर येथे होता आणि दुसऱ्या दिवशी तो गुहाटीला निघून गेला होता असे सचिन पवारचे  वकिल समाधान सुलाने यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

बारबाला चौकशीसाठी ताब्यात

उदानीला हनीट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी ज्या बारबालेला बोलवण्यात आले होते, तिचा पंतनगर पोलिसांनी शोध घेऊन रविवारी तीला चौकशिसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यात ही बार बाला महत्वाची साक्षिदार बनू शकते असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.

हेही वाचा – 

हिरे व्यापारी हत्या: गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांच्या माजी ‘पीए’ला अटक

लव्ह ,सेक्स ,पैसे आणि धोका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -