घरमुंबईजे. जे रक्तपेढीत लवकरच रक्त घटक विभाग

जे. जे रक्तपेढीत लवकरच रक्त घटक विभाग

Subscribe

जे.जे. रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांसाठी खूशखबर आहे. जे.जे रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांना आता रक्तघटकांसाठी दुसर्‍या रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. कारण, लवकरच जे.जे रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त घटक विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच या विभागातून रक्तासोबतच रक्तघटक ही उपलब्ध होणार आहे.

जे.जे. रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांसाठी खूशखबर आहे. जे.जे रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांना आता रक्तघटकांसाठी दुसर्‍या रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. कारण, लवकरच जे.जे रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त घटक विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच या विभागातून रक्तासोबतच रक्तघटक ही उपलब्ध होणार आहे.

अनेकदा डेंग्यू , मलेरिया, कॅन्सर किंवा भाजलेल्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तघटकांची म्हणजेच प्लाझमा, प्लेटलेट्स, पॅकसेल्सची गरज भासते. खासगी रुग्णालयात हे घटक सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खूप महाग मिळतात. अनेकदा स्वत : च्या स्वार्थासाठी रक्तपेढीत रक्त प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारलं जात असल्याची तक्रारीही केल्या जातात. त्याचा भुर्दंड गरीब, मध्यम वर्गीय रुग्णांना बसतो.

- Advertisement -

आता जे.जे. या रुग्णालयाच्या रक्तपेढीत ही रक्त घटक विभाग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे इथे येणार्‍या रुग्णांना बाहेरुन किंवा खासगी रुग्णालयातून रक्त घटक विकत घेण्याची गरज पडणार नाही. राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी), नॅको आणि राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदे (एनबीटीसी) च्या नियमानुसारच या ही रक्तपेढीतून रक्त घटक पुरवले जाणार आहे. एका रक्तदात्याच्या रक्तदानाचा फायदा जवळपास ३ ते ४ रुग्णांना होतो. एखाद्या व्यक्तीचा खूप रक्तस्त्राव झाला तर त्याला आरबीसी म्हणजेच लाल रक्तपेशी दिल्याने त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. एका रक्तदात्याच्या रक्ताचे काही भाग वेगळे घटक बाजूला केले जातात म्हणजेच प्लाझमा, प्लेटलेट्स , लाल रक्तपेशी, पॅक सेल्स हे घटक वेगळे केले जातात. ज्याचा फायदा ३ ते ४ जणांना होतो.

काय होणार फायदा?एकाने रक्तदान केल्यास त्याचा फायदा हा ३ ते ४ रूग्णांना होतो. एखाद्या व्यक्तीला खूप रक्तस्त्राव झाला तर त्याला आरबीसी म्हणजेच लाल रक्तपेशी दिल्याने त्याचा जीव वाचवता येऊ शकतो. एका रक्तदात्याच्या रक्ताचे प्लाझमा, प्लेटलेट्स, लाल रक्तपेशी, पॅक सेल्स हे घटक वेगळे केले जातात. त्यामुळे ३ ते ४ जणांना फायदा होतो. याविषयी जे.जे. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. राहुल तासपांडे यांनी सांगितले की, अधिकारी पातळीवर रुग्णालयात हा विभाग सुरू व्हावा असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. राज्य सरकारचे मेडिकल कॉलेजे म्हणजेच जे.जे, कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज मधील रुग्णांकरीता हे रक्त घटक पुरवले जातील. त्याठिकाणच्या रुग्णांची पूर्तता व्हावी असा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा विभाग लवकरच सुरू व्हावा असा आमचा मानस आहे.

- Advertisement -

शासनाच्या नियमानुसारचं आकारणार शुल्क –आतापर्यंत महानगर या रक्तपेढीतून ब्लड कंम्पोनंट घेतले जात आहेत. पण, या पुढे जे.जेच्या रक्तपेढीत रक्त घटक वेगळे करता येतील. शिवाय, ब्लड कंम्पोनंटसाठी ट्रायल बेसेसवर लवकरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या रक्त घटकांची किंमत अजून तरी ठरलेली नाही. पण, शासनाच्या नियमानुसारच सर्व काही घटकांचं शुल्क आकारण्यात येणार आहे. तसंच, या ब्लड कंम्पोनंटच्या विभागासोबत येत्या सप्टेंबरपर्यंत आणखी ५ ते ६ गोष्टींचं उद्घाटन करण्यात येणार आहे.
डॉ. मुकुंद तायडे, अधिष्ठाता, जे.जे रुग्णालय

या विभागांचं होणार उद्धाटनयेत्या सप्टेंबरपर्यंत जे.जे रुग्णालयात जवळपास ५ ते ६ विभाग नव्यानं सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी लेझरने स्टोन तोडणे म्हणजेच ई.एस डब्लू विभाग, फार्मसी अ‍ॅण्ड ओपीडी, कॉस्मेटिक सर्जरी ओपीडी , अपंगांसाठी वेगळं रजिस्ट्रेशन काऊंटर, तसंच, ब्लड कंम्पोनंट विभाग यांचा समावेश आहे. जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी ‘माय महानगर ’शी बोलताना ही माहिती दिली आहे.

 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -