घरमुंबई‘त्या’ बचत गटाला परवाना नाही; चार जणांवर उपचार सुरू

‘त्या’ बचत गटाला परवाना नाही; चार जणांवर उपचार सुरू

Subscribe

भांडुपमधील सह्याद्री विद्या मंदिर शाळेतील 17 मुलांना व मदतनीस महिलेला गुरुवारी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाचा पुरवठा करण्याचे कंत्राट लिंगेश्वर महिला बचत गटाकडे होते. परंतु स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेला अन्न व औषध प्रशासनाचा परवानाच बचत गटाकडे नसल्याचे उघडकीस आले आहे.

भांडुपमधील सह्याद्री विद्या मंदिर शाळेतील १७ मुलांना व मदतनीस महिलेला गुरुवारी माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाचा पुरवठा करण्याचे कंत्राट लिंगेश्वर महिला बचत गटाकडे होते. परंतु स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेला अन्न व औषध प्रशासनाचा परवानाच बचत गटाकडे नसल्याचे उघडकीस आले आहे.

सह्याद्री विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन पुरवण्याचे कंत्राट लिंगेश्वर महिला बचत गटाकडे आहे. या बचत गटाकडून पुरवलेले अन्न खाल्ल्यामुळे मुलांना त्रास झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बचत गटाच्या स्वयंपाकघरावर कारवाई केली. या कारवाईमध्ये स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेला परवानाच बचत गटाकडे नसल्याचे त्यांच्या उघडकीस आले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (अन्न) सहआयुक्त शैलेश आढाव यांनी ‘महानगर’ला सांगितले. लिंगेश्वर महिला बचत गटाने नोदणी केल्यानंतर स्वयंपाकघरासाठी एफडीएकडून ज्या जागेचा परवाना घेतला होता. त्या जागेमध्ये स्वयंपाक करण्यात येत नव्हता. अन्य ठिकाणी स्वयंपाक करण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या स्वयंपाकघराला एफडीएने टाळे ठोकले आहेत. एफडीएकडून स्वयंपाकघरातील अन्नाचे नमूनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अहवालात काही दोष आढळल्यास बचत गटावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही आढाव यांनी दिली.

- Advertisement -

गुरुवारी सकाळी १६ विद्यार्थी व मदतनीस महिलेला माध्यान्ह भोजनानंतर त्रास झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा आणखी एका विद्यार्थीनींच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यातील १४ जणांना शुक्रवारी घरी सोडले. हॉस्पिटलमध्ये असलेला अर्थव उतेकर याला उलटीचा, क्रिश नाईक याला जुलाब तर मयुरी जाधव हिच्या अजूनही पोटात दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मदतनीस विद्या लाड हिच्यावरही उपचार सुरू आहेत, अशी माहिती अथर्वचे वडील शाम उतेकर यांनी दिली.

रात्री उशीरा आणखी एका विद्यार्थीनींच्या पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते. 14 विद्यार्थ्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात आले आहे. तर चौघांना त्रास होत असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. या चौघांचीही प्रकृती स्थिर असून, शनिवारी त्यांना घरी सोडण्यात येईल.
डॉ. उषा मोपरेकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एम.टी. अगरवाल हॉस्पिटल

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -