घरमुंबई'देव तारी त्याला कोण मारी'; लोकलमध्ये सापडले सात दिवसांचे अर्भक

‘देव तारी त्याला कोण मारी’; लोकलमध्ये सापडले सात दिवसांचे अर्भक

Subscribe

लोकलच्या मोटरमन डब्यात पिशवीमध्ये एका कापडात गुंडाळलेले ६ दिवसांचे जिवंत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, अशीच एक धक्कादायक घटना मुंबई लोकलमध्ये घडली आहे. अवघ्या सात दिवसांच्या बाळाला जीवनदान मिळाले आहे. लोकलच्या मोटरमन डब्यात पिशवीमध्ये एका कापडात गुंडाळलेले ६ दिवसांचे जिवंत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मध्यरात्री १२.४९ च्या भायंदर स्लो-लोकलमध्ये मोटरमनच्या सीटखाली एक बेवारीस पिशवी आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दूरध्वनीवर वरून मिळाली होती. पोलिसांनी ती पिशवी उघडून पाहिल्यात त्या त्यांना अर्भक आढळले. ते अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तात्काळ सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

baby
सात दिवसांचे अर्भक

भायंदर स्लो-लोकलमध्ये मोटरमनच्या सीटखाली एक लावारीस पिशवी असल्याची माहिती मिळताच. आम्ही घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा या पिशवीत नवजात अर्भक आमच्या निदर्शनात आले. तेव्हा आम्ही लगेच यांची माहिती जीआरपी आणि स्टेशन मोस्टरला दिली आणि तात्काळ सायन हॉस्पिटलमध्ये या अर्भकाला दाखल केले आहेत.
– जे. पी. मीना, पोलीस निरीक्षक, आरपीएफ दादर

- Advertisement -
baby
सात दिवसांचे अर्भक

काय आहे संपूर्ण प्रकरण

काल, शनिवारी रात्री १२. ४९ च्या सुमारास भायंदर स्लो-लोकलमध्ये मोटरमनच्या सीटखाली पिशवी आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांना दूरध्वनीवर वरून मिळाली होती. त्यानंतर भायंदर स्लो लोकल ही दादर रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येताच गस्तीवर असलेले आरपीएफचे दोन जवान रामवतार गुर्जर आणि लखन लाल सैनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करता यांना मोटरमनच्या डब्यात एक लावारीस पिशवी मोटरमनच्या सीटखाली दिसली. तेव्हा पिशवी बघताच एका कपड्यात पुरुष जातीचे अर्भक दिसून आले. वेळ न गमावता रामवतार गुर्जर आणि लखन लाल सैनी यांनी अर्भक ताब्यात घेतले आणि ही माहिती आरपीएफचे पोलीस निरीक्षक जे. पी. मीना यांना दिली. यांनी वेळ न गमावता स्टेशन मास्टर संतोष बोरकर आणि जीआरपीशी संपर्क करून तात्काळ सायन हॉस्पिटलमध्ये मुलाला दाखल केले आहेत. दैनिक ‘आपलं महानगर’ने सायन हॉस्पिटलची संपर्क केला असतात सायन हॉस्पिटलचे एएमओ डॉ. नवीम यांनी सांगितले की, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे मूल सुरक्षित आहे. हा अर्भक पुरुष जातीचा असून फक्त ६ ते ७ दिवसाचा आहे. या अर्भकाची प्रकृती सामान्य आहे. सद्या आम्ही या मुलाच्या प्रकृतीवर लक्ष देत आहोत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -