घरमुंबईसरकारची प्लास्टिक पिशव्यांना मान्यता

सरकारची प्लास्टिक पिशव्यांना मान्यता

Subscribe

वसईकर शेतकर्‍यांना दिलासा

राज्य सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांना पुन्हा मान्यता दिली असून वसईकर शेतकर्‍यांच्या मागमीनुसार आता 51 मायक्रॉन जाडीच्या पिशव्या पुन्हा वापरात येणार आहेत.वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोगरा, कागडा, तगर, सोनचाफा, जास्वंदी, मोगरा, जुई, सायली या फुलांची लागवड केली जाते. पानवेल, भातशेती, केळी आणि इतर भाज्या नामशेष होत असताना, या फुलांच्या विक्रीवरच आजही हजारो शेतकरी तग धरून आहेत. तालुक्यातील पाच हजार शेतकरी दररोज सोनचाफा आणि जास्वंदी फुलांचे 15 लाखांहून अधिक नग आणि हजारो किलो मोगरा ही फुले दादर आणि मुंबईच्या अनेक परिसरात विक्रीसाठी नेली जातात. याच फुलांच्या विक्रीतून शेकडो शेतकर्‍यांच्या अनेक पिढ्या उपजीविका करत आहेत. मात्र, या फुलांच्या विक्रीत 23 जूनपासून मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांचे महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वसईतील शेतकर्‍यांच्या अस्तित्वाचा शेवटचा मार्गही बंद होऊ लागला होता.

फुलांसाठी प्लास्टिक पिशव्या

23 जूनला राज्यात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे फुले बांधण्याची समस्या शेतकर्‍यांना जाणवू लागली. विक्रीसाठी लोकल ट्रेनने नेण्यात येणार्‍या फुलांची प्लास्टिकच्या पिशव्यात बांधणी करावी लागत होती. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे वसईतील फुले शेतावरच सुकून जाऊ लागली. कागदी पिशव्यांमध्ये बांधणी केल्यास फुले अर्ध्या रस्त्यातच सुकून गळून पडू लागली. 51 मायक्रॉन जाड्या पिशव्यांचा वापर केल्यास मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जात होती.

- Advertisement -

दरम्यान, पावकिलो वजनाच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करण्यास व्यापार्‍यांना राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांनाही 51 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वसईतील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्र्यांकडे केली होती.

५१ मायक्रॉनच्या पिशव्यांना मान्यता

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली वसईतील अर्नाळा सेंद्रिय उत्पादक स्वयंसाह्यता गटाचे सुभाष भट्टे, वासुदेव पाटील, किरण पाटील, महेंद्र पाटील, पुरुषोत्तम कुडू यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर 51 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास पर्यावरण विभागाचे सचिव अनिल डीग्गीकर यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. प्लास्टीकला आमचाही विरोध आहे. मात्र, फुले ताजी राहण्यासाठी त्यांच्यावर पाण्याचा मारा करावा लागतो.अशावेळी कागदी पिशव्या फाटून जातात. तर प्लास्टीकच्या पिशव्या टिकून राहतात. या पिशव्यांना सक्षम पर्याय मिळेपर्यंत 51 मायक्रॉनच्या पिशव्या वापरण्याची परवानगी मागितली होती. ती अद्यादेश काढून सरकारने मान्य केली आहे, असे राजोडीचे माजी सरपंच तथा शेतकरी सुभाष भट्टे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -