घरलाईफस्टाईलनववधूची केशरचना करताना

नववधूची केशरचना करताना

Subscribe

मुख्य लग्नसमारंभात करायच्या केशरचनेमध्ये डेकोरेशनला भरपूर वाव असतो. त्यामुळे यावेळी आर्टिफिशियल डेकोरेशन ऐवजी खर्‍या फुलांचा जास्तीत जास्त वापर करून विविध केशरचना करता येतात.

*नववधूची उंची, तिचा मूळ रंग, मुख्य समारंभात नववधू परिधान करणारा असलेला पोशाख आणि नववधूच्या वावरण्यात सहजता येईल अशा केशरचनांचा समावेश असावा. मुख्य समारंभाच्या वेळी केशरचना करताना काही काळजी मात्र जरूर घ्यावी. नववधूच्या चेहर्‍यावर सारखे-सारखे केस येतील अशी केशरचना टाळावी किंवा चेहरा अगदी ओढल्यासारखा दिसेल अशीही केशरचना टाळावी.

- Advertisement -

*मुख्य किंवा इतर विधींच्या प्रसंगी करावयाच्या केशरचनेआधी केसांना व्यवस्थित शाम्पू-कंडिशनिंग केलेले असावे. त्यामुळे केशरचना करताना सोपी जाते आणि केस जास्त ओढले जात नाहीत वा केस तुटत नाहीत.

*आजकाल बाजारात केस धुतल्यानंतर केसांना लावायचे विविध लोशन आणि क्रीमही उपलब्ध आहेत. यांच्या वापरामुळे केस मोकळे तर होतातच; पण केशरचना करणेही सोपे जाते. मात्र, अशा क्रीम्स अथवा लोशनचा वापर तुमच्या केसांचा पोत कसा आहे याची माहिती करून घेतल्याशिवाय करू नका. नाहीतर ऐनवेळी केस खूप जास्त तेल लावल्यासारखे तेलकट दिसतील आणि केशरचना करणे अवघड होऊन बसेल. अशा क्रीम्स आणि लोशन शक्यतो ब्रँडेड वापरावेत म्हणजे केसांच्या मुळांना हानी पोहोचणार नाही. शिवाय सर्व विधींनंतर केस पूर्ववत करताना वा ती हेअरस्टाईल मोकळी करतानाही सोपे जाईल अशी केशरचना असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -