घरमुंबईसीसीटीव्ही नादुरूस्त,प्रशासन सुस्त

सीसीटीव्ही नादुरूस्त,प्रशासन सुस्त

Subscribe

कुर्ला स्टेशनवर आरोपीचा शोध लागेना

कुर्ला रेल्वे स्थानकावर एका अज्ञात इसमाने टीसीवर दगड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र 48 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही आरोपीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज चेक करत आहे. मात्र फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसून येत नसल्यामुळे आता स्केचेस आर्टीसची मदत पोलिसांना घेण्याची पाळी आली आहे. त्यामुळे कुर्ला रेल्वे स्थानकावर प्रवाशांबरोबर रेल्वे कर्मचार्‍यांचा सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

मध्य रेल्वे सर्व रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात येतो. मात्र याच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नियमित देखभाल होत नाही. त्यामुळे बर्‍याचदा रेल्वे स्थानकांवर अनेक सीसीटीव्ही आज नादुरस्तीच्या अवस्थेत आहेत. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आज कुचकामी ठरत आहेत. नुकतेच कुर्ला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर तिकीट तपासणीस सिकंदर सिंग रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास टीसी कार्यालयात आपल्या सहकार्‍यांबरोबर बसले होते.

- Advertisement -

कार्यालयीन काम करत असताना सिंग यांच्या दिशेने अज्ञात इसमाने दगड मारला आणि तो पळून गेला. या हल्ल्यात सिंग यांच्या चेहरा आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात या हल्ल्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र 48 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही आरोपीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आलेले नाही.

रेल्वे कर्मचार्‍यांची सुरक्षाही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, प्रवाशांबरोबरच रेल्वे कर्मचार्‍यांना सुुरक्षा पुरविण्यात मध्य रेल्वे अपयशी ठरत आहे. तिकीट तपासणीसावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या हल्ल्याबाबत मध्य रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. -अमित भटनागर, उपाध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -