घरमुंबईगिरगावमध्ये नववर्षाचा अनोखा उत्साह

गिरगावमध्ये नववर्षाचा अनोखा उत्साह

Subscribe

पारंपारिक वेशभूषेत लहानांपासून ते अगदी वयोवृध्दांपर्यंत सर्व जण या शोभायात्रेत सहभागी झाले आहे.

राज्यभरामध्ये नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जात आहे. मुंबईतले सांस्कृतिक ठिकाण म्हणून ओळख असलेल्या गिरगावमध्ये नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे गिरगावात नववर्षाच्या स्वागताचा एक वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे. शोभायात्रेला सुरुवात झाली असून यावर्षीचे वैशिष्ट म्हणजे आदिवसी विद्यार्थ्यांच्या हस्ते या शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले आहे. पारंपारिक वेशभूषेत लहानांपासून ते अगदी वयोवृध्दांपर्यंत सर्व जण या शोभायात्रेत सहभागी झाले आहे. गिरगावमधील महिलांमध्ये एक खास उत्साह असतो तो म्हणजे पारंपारिक वेषभूषा करुन बुलेटवारी करत या महिला शोभायात्रेत सहभागी होतात.

पहाटेपासूनच गिरगावात नववर्षाचा उत्साह आहे. नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून ढोल-ताशे, लेझीमच्या गजरात नववर्षाचे स्वागत केले जात आहे. या शोभायात्रेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गिरगावच्या रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रांगोळ्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -