घरदेश-विदेशमहिलांनो, मांसाहार खा; सुदृढ रहा!

महिलांनो, मांसाहार खा; सुदृढ रहा!

Subscribe

शाकाहारींपेक्षा मांसाहारी महिला सुदृढ असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

सुदृढ राहण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर तेलकट तुपट न खाता शाकाहारी खाण्याचा सल्ला देतात आणि आपण त्याप्रमाणे वरण, भात, पोळी – भाजी असा आहार घेतो. मात्र शाकाहीरींपेक्षा मांसाहार खाणाऱ्या महिला या शाकाहारी महिलांच्या तुलनेत अधिक सुढृढ असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालय (AIMS) आणि शेरे-कश्मीर इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) मधील संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

या संशोधनातून आले समोर

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालय (AIMS) आणि शेरे-कश्मीर इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) मधील संशोधकांनी याचा शोध लावला आहे. या दोन्ही संस्था २०१५ पासून शाकाहार आणि मांसाहार खाणाऱ्या महिलांच्या शरीरावर होणारे परिणाम यावर संशोधन करत होत्या. या दोन्ही संस्थांचे २०१८ मध्ये संशोधन पूर्ण झाले आहे. नुकताच या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये शाकाहारींपेक्षा मांसाहारी महिला अधिक सुदृढ असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मांसाहार आणि शाकाहार संबंधित आजार

शाकाहार करणाऱ्या महिलांमध्ये ह्रदयाशी संबंधित आजार, स्थूलपणा, टेन्शन, कॅन्सर, यकृताशी संबंधित हे आजार आहेत. या संशोधनात हे आजार शाकाहार करणाऱ्या महिलांमध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे. तर या मांसाहार करणाऱ्या महिलांना हे आजार होत नसल्याचे समोर आले आहे.

४६४ महिलांवर केले संशोधन

एम्स रुग्णालय (AIMS) आणि शेरे-कश्मीर इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (SKIMS) मधील संशोधकांनी हे संशोधन करण्यासाठी दिल्ली आणि काश्मीर येथील एकूण ४६४ महिलांवर संशोधन केले होते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांना असलेले आजार, याचबरोबर त्यांच्या इतर वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या. त्यासाठी त्यांना ७२ तासांचे डाएट प्लान देण्यात आला होता. तपासणीत मांसाहार खाणाऱ्या कश्मीरमधील महिला दिल्लीतील महिलांच्या तुलनेत अधिक सुदृढ असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – मांसाहारावर ताव मारताना लक्षात ठेवा या गोष्टी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -