घरमुंबईमालाड भिंत घटना - दहावीतल्या सुमीतला हाता-पायाला फ्रॅक्चर

मालाड भिंत घटना – दहावीतल्या सुमीतला हाता-पायाला फ्रॅक्चर

Subscribe

सुमीतच्या सर्व कुटुंबियांना मार लागला असून ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करुन डिस्चार्ज दिला आहे.

“माझ्या अंगावर कपाट पडलं. काय सुरू होतं एका क्षणाला कळलंच नाही. सर्व घरचे झोपले होते. त्यानंतर आमच्या घरांवर भिंत कोसळली हे माहित झालं.” ही परिस्थिती सांगतोय १४ वर्षांचा सुमीत जाधव. जन्मापासून मालाडच्या पिंपरीपाडा परिसरात राहत आहे. पण, सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास मुसळधार पावसामुळे या परिसरातील संरक्षक भिंत कोसळली आणि या घटनेत एकूण २४ जणांचा मृत्यू झाला तर, आजही ७२ जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईतील पावसाचा वाढता जोर हा मालाडच्या पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या जीवावर बेतला. याच घटनेत जखमी झाला १४ वर्षीय सुमीत जाधव. सुमीतवर सध्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुमीत सध्या दहावीत असून जवळच्याच चंद्रभागा शाळेत तो शिकत आहे. सुमीतच्या कुटुंबातील प्रत्येकाला मार लागला. सर्वांवर ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण, सुमीतच्या डाव्या हाता-पायाला जबर मार बसल्याने त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. त्याच रात्री त्याच्या हात आणि पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

सुमीतचा चुलत भाऊ पिंटू जाधव यांनी सांगितलं की, ” घरावर भिंत कोसळल्यानंतर सर्वच त्यात अडकले. मी त्यावेळेस तिथे नव्हतो. पण, सुमीतच्या डाव्या हातावर आणि पायावर कपाट पडल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. माझ्या मुलाला आणि पत्नीलाही मार लागला आहे.”

सुमीतचा चुलत भाऊ पिंटू जाधव

या घटनेतील‌ आणखी एक चार वर्षांची मुलगीही जखमी झाली आहे. या मुलीवरही केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं केईएम हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -