घरमुंबईकुंडी धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

कुंडी धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Subscribe

कुंडी धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू भोवऱ्यात सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कुंडी धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज महेंद्र मोरे (१८) हा आपल्या भावासह आपल्या मित्रांसोबत करंजाडे येथील कुंडी धबधब्यावरती मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. मित्र आणि भावाबरोबर पोहण्याचा आनंद घेत असताना राज हा धबधब्याच्या काही अंतरावरती असणाऱ्या पाण्याचा भोवऱ्यामध्ये फसला गेला आणि त्यात राजचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, राज हा धबधब्याचा आनंद घेत असताना पुढे जाऊ लागला. पुढे पुढे जातअसताना पाण्याची पातळी देखील वाढत होती. राज हा काही अंतरावर गेल्यानंतर तो पाण्याचा भोवऱ्यामध्ये फसला गेला आणि त्याततो वाहून गेला. हा घडलेला प्रकार भावाच्या आणि मित्राच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब आपल्या नातेवाईकांना सांगितली. नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी सदर घटना पोलिसांना कळवली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि निसर्ग मित्र पनवेल यांच्याकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. परंतु राज हा भोवऱ्यामध्ये फसला गेल्याने शोधकार्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे रात्री उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला असून भोवऱ्यामध्ये अडकल्याने त्याचे शरिर खडकावरती आपटले गेले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून या धबधब्यावरती यापुढे कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये, असा इशारा आजूबाजूच्या परिसरातील राहिवाशांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नापणे- शेर्पे धबधबा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -