घरमुंबईमालाडमध्ये पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळली; एकाचा मृत्यू

मालाडमध्ये पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळली; एकाचा मृत्यू

Subscribe

मालाडमध्ये पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मालाडमध्ये पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. मालाडच्या पिंपरी पाडा येथील शिवनेरी हायस्कूलजवळ ही घटना घडली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याअगोदरही मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत २१ जणांचा हकनाक बळी गेला होता. त्याचबरोबर पुण्याच्या कोंडवा परिसरातही इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा बळी गेला होता. मंगळवारी मध्यरात्री कल्याणच्या नॅशनल उर्दू शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेतही ३ जणांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -