घरमुंबईशिक्षण क्षेत्रातील या संस्थेतर्फे कांता कालन यांना एक लाख रुपयांची मदत

शिक्षण क्षेत्रातील या संस्थेतर्फे कांता कालन यांना एक लाख रुपयांची मदत

Subscribe

४ ऑगस्टच्या पावसात स्वतःचे घर वाहून गेलेले असताना आणि सतत पावसाची रिपरिप सुरु असतानाही कांता मारुती कालन यांनी पाण्याचा निचरा व्हावा म्हणून तुलसी पाईप रोडवरील गटाराचे झाकण उघडले आणि त्यात कोणताही अपघात होवू नये म्हणून त्याठिकाणी त्या तब्बल सात तास उभ्या राहिल्या. त्यांची ही कथा माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यावर डिजिटल शिक्षणामध्ये कार्यरत असलेल्या व्हॅल्यूएबल एडयुटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडने कालन यांना १ लाख १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यातील १ लाख रुपये हे कलान यांना घरासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी आहेत, तर उर्वरित रक्कम ही त्यांच्या पावसात वाहून गेलेल्या पैशांच्या मोबदल्यात दिली जात आहे.

“४ ऑगस्टच्या त्या पावसात कांता कालन यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचा जीव वाचवला. त्यांचे घर आणि त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी जमा केलेले १० हजार वाहून गेले आहेत, असे जेव्हा आम्हाला कळले तेव्हा आपण त्यांची मदत केली पाहिजे, असे आम्हाला मनापासून वाटले. व्हॅल्यूएबल एडयुटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ही डिजिटल एज्युकेशन कंपनी आहे आणि शिक्षण सर्वांना उपलब्ध करून द्यावे या प्राथमिक उद्देशाने आम्ही डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत आहोत. कांता यांच्या दोन मुलींच्या शिक्षणात खंड पडू न देणे, ही आपली जबाबदारी आहे असे मानून हा निर्णय आम्ही घेतला आहे. १ लाख रुपयांची मदत हे त्यांचे घर व मुलींच्या शिक्षणासाठी असून १० हजार रुपये हे त्यांच्या वाहून गेलेल्या पैशांचा मोबदल्यात आहेत. इतरही लोक पुढे येवून कालन यांना मदत करतील, अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे,” असे उद्गार ‘व्हॅल्यूएबल एडयुटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक अमेय हेटे यांनी काढले आहेत.

- Advertisement -

मुंबईत माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या तुलसी पाईप रोडवर कालन या पदपथावर राहतात आणि फुलविक्री करून आपल्या दोन मुलींची आणि त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतात. ३ तारखेला पडलेल्या मुसळधार पावसाने कालन आणि त्यांच्या मुलींची संपूर्ण रात्र जागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तुलसी पाईप रोड पाणी साचले होते. त्यात त्यांचे पदपथावरचे झोपडीवजा घर वाहून गेले. रस्त्यावरचे पाणी वाढत चालल्याने पुढील अनावस्था टाळण्यासाथी त्यांनी रस्त्यावरचे मॅनहोल उघडून पाण्याला वाट करून देण्याचा निर्णय घेतला. मॅनहोल उघदल्यावर त्यांच्या लक्षात आले की झाकण उघडे राहिल्यास त्यात कोणीही पडून आपला जीव गमावू शकेल. तीन वर्षांपूर्वी डॉ दीपक अमरापूर यांचा प्रभादेवी येथे मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूचे उदाहरण आजही ताजे आहे.

कांता कालन

अशाप्रकारे कोणताही अपघात होवू नये म्हणून त्या भर पावसात त्या मॅनहोलपाशी उभी राहिल्या आणि वाहनांना, पादचाऱ्याना त्यांनी मार्गदर्शन केले. काही मिनिटे किंवा एक-दोन नव्हे तर तब्बल सात तास त्यांनी हे काम केले. स्वतःचे घर वाहून गेलेले असताना, स्वतःच्या दोन शाळकरी मुलींची चिंता असताना लोकांच्या हितासाठी त्या हे सेवाकार्य करत होत्या. मॅनहोलपाशी सात तास उभे राहून, पाणी कमी झाल्यावर त्या परत आल्या तेव्हा ते ‘घर ‘ वाहून गेलेले दिसले. दोन्ही मुलींच्या ऑनलाईन शिक्षणासाठी साठवलेले दहा हजार रुपयेही घरासोबत वाहून गेले होते. त्यांच्या दोन मुली जानकी आणि तमिलश्री या आठवी आणि दहावीत शिकत आहेत.

- Advertisement -

आपले घर परत कसे उभारायचे आणि पैसे वाहून गेल्याने आता मुलींचे शिक्षण कसे करायचे, याची चिंता कालन यांना लागून राहिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आणि त्यांची कथा माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यावर डिजिटल शिक्षणामधील आघाडीवर असलेल्या ‘व्हॅल्यूएबल एडयुटेन्मेंट’ने त्यांची दखल घेतली. समूहाने त्यांना १ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. त्यातील १ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले गेले असून ११००० रुपये रोख स्वरुपात त्यांच्याकडे सुपूर्द केले गेले आहेत.

हेही वाचा –

Coronavirus: देशात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत ६५ हजार नव्या रुग्णांची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -