घरमुंबईहिंजवडी बलात्कार प्रकरण : आणखी दोन संशयित ताब्यात

हिंजवडी बलात्कार प्रकरण : आणखी दोन संशयित ताब्यात

Subscribe

६ सप्टेंबर रोजी पीडित मुलींवर दोघांनी बलात्कार केल्याचे समोर आले होते. त्यापैकी कोम्यात गेलेल्या एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुणे : पिंपरी चिंचवडच्या कासारसाईतील बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या दोन पीडित मुलींवर या आधीही बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखी दोघा संशयितांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १६ सप्टेंबर रोजी पीडित मुलींवर दोघांनी बलात्कार केल्याचे समोर आले होते. त्यापैकी कोम्यात गेलेल्या एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पीडित मुली १६ सप्टेंबर रोजी कासारसाई परिसरातील मंदिराच्या आवारात खेळायला गेल्या होत्या. यादरम्यान गणेश व त्याच्या साथीदाराने त्या मुलींना गाठले. त्यांनी चॉकलेटचे आमिष दाखवून दोघींना मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडीमध्ये नेले. तेथे दोघींवर बलात्कार केला. दोन्ही पीडित मुलींनी झालेला प्रकार घरी सांगितला नव्हता. मात्र, मंगळवारी एकीच्या पोटात दुखू लागल्याने तिला औंध येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर महिला पोलिसांनी दुसर्‍या मुलीला विश्वासात घेत तिला बोलते केले. यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली.

- Advertisement -

दरम्यान, मंगळवारी पुढील तपासात याआधी ही असा प्रकार घडल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली. त्यामुळे अन्य दोघा संशयितांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

काय आहे हिंजवडी बलात्कार प्रकरण ? 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -