घरमहाराष्ट्रदोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

Subscribe

दोन्ही मुली अत्यंत भीतीखाली असल्याची माहिती घरच्या मंडळीला नव्हती. मंगळवारी त्यातील एका मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले.

पिंपरी : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडी परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील एका मुलीचा बुधवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.याप्रकरणी गणेश निकम (२२) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

रविवारी सुट्टी असल्याने कासारसाई येथील मंदिर परिसरात दोन्ही अल्पवयीन मुली खेळायला गेल्या होत्या.त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या दोघींसोबत कोणीही मोठी व्यक्ती नसल्याचे पाहून नराधम गणेश निकम हा अल्पवयीन आरोपीसह त्याठिकाणी गेला. त्याने त्या मुलींना चॉकलेटच अमिष दाखवून मंदिराच्या पाठीमागील घनदाट झाडीत नेले. तेथे दोन्ही मुलींवर बलात्कार केला. त्यातील एका मुलीवर पुन्हा दुसर्‍या अल्पवयीन आरोपीने बलात्कार केला. त्यामुळे त्या मुली पुरत्या हादरून गेल्या. याबद्दल कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी गणेश निकम आणि त्या अल्पवयीन आरोपीने मुलींना दिली.

- Advertisement -

दोन्ही मुली अत्यंत भीतीखाली असल्याची माहिती घरच्या मंडळीला नव्हती. मंगळवारी त्यातील एका मुलीच्या पोटात दुखायला लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. हिंजवडी पोलिसांनी दुसर्‍या मुलीला विश्वासात घेऊन घटनेची माहिती घेतली आणि गुन्हा दाखल केला.परंतु पीडित मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन आरोपीसह गणेश निकम याला पोलिसांनी अटक केली. दोन्ही पीडित मुली या ऊसतोड कामगाराच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आरोपी गणेश निकम हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून खाजगी नोकरी ही करतो. अल्पवयीन मुलगा हा अकरावीत शिक्षण घेत आहे. या घटनेचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -