घरमुंबईसचिन वाझेंची क्राईम ब्रँच मधून उचलबांगडी, अनिल देशमुख यांची घोषणा

सचिन वाझेंची क्राईम ब्रँच मधून उचलबांगडी, अनिल देशमुख यांची घोषणा

Subscribe

सचिन वाझे असो किंवा कुणीही असो शासन कुणाला पाठीशी घालणार नाही.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे असिस्टंट पोलीस इंस्पेक्टर सचिन वाझे यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर सदस्यांनी विधानपरिषदेत केली यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तरात घोषणा केली की, सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून बदली करण्यात येईल. वाझेंची दुसऱ्या विभागात बदली करण्यात येईल जेणेकरून मनसुख हिरेन प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. मात्र विरोधक सचिन वाझे यांच्या निलंबनासाठी आग्रही असून निलंबणानंतर त्यांना अटक करण्यात यावी यासाठी गदारोळ करत आहेत. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चर्चा झाल्यानंतर सचिन वाझेंना क्राईम ब्रँचमधून बदली करण्याचा निर्णय झाले असल्याचे बोलले जात आहे. विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंविरोधात अनेक पुरावे आहेत त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करावी, सचिन वाझेंची भूमिका संशयास्पद आहे. त्यांना निलंबित करावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि इतर सदस्यांनी केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तरात बदली करण्यात येणार असल्याचे सांगितले.

- Advertisement -

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे असो किंवा कुणीही असो शासन कुणाला पाठीशी घालणार नाही. विरोधकांकडे अधिकचे पुरावे असतील तर त्यांनी एटीएसच्या पथकाला द्यावे जेणेकरुन मनसुख प्रकरणात कडक कारवाई होईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -