अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी म्हणतो…’मला मुंबई पोलिसांना महत्त्वाचे सांगायचय’

underworld don ravi pujari arrested
रवी पुजारी

दक्षिण आफ्रिकेतून प्रत्यार्पण करुन भारतात आणलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीने आपली पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे. आपल्याला मुंबई पोलिसांना महत्त्वाचे काहीतरी सांगायचे आहे, असे म्हणत त्यांनी आपली पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने येत्या १५ मार्चपर्यंत रवी पुजारीची पोलीस कोठडीत वाढ केली आहे. मात्र, आता रवी पुजारीला नेमके काय सांगायचे असेल? अशी कोणती महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

काय म्हाणाल रवी पुजारी?

‘आपल्याला काही गोष्टींची तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यायची आहे. त्यामुळे मला पोलीस कोठडी वाढवून हवी आहे’.

२०१६साली विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. त्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने ८ जणांना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी असलेल्या रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पण अर्ज दाखल केला होता. त्यानंतर रवी पुजारीला ताब्यात घेऊन विशेष मोक्का न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, आता हा कालावधी संपत आहे. परंतु, आता रवी पुजारी यांनी आपला कालावधी वाढवून मागितला आहे.


हेही वाचा – सचिन वाझे डान्सबार, लेडीजबारवरही धाडी टाकण्यात होते आघाडीवर