घरमुंबई'बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण', गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

‘बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण’, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येची केस अखेर सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेत. त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह राजपूतची केस सीबीआयकडे सुपूर्द केली या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सीबीआयला राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करेल. मुंबई पोलिसांच्या तपासात सुप्रीम कोर्टाने कोणतीही त्रुटी काढली नाही. मुंबई पोलिसांच्या तपासात कोणाताही दोष नव्हता. मुंबई पोलिसांनी योग्य तपास केला. मात्र बिहारमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करण्यात आले आहे.’

काय म्हणाले अनिल देशमुख

या सर्व प्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या लक्षात ठेवून काही नेते राजकारण करत आहेत. पण सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचे सांगितले असून ते जास्त महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआय करणार की मुंबई पोलीस यावर आज, बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. अखेर सुशांत सिंह प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे. सर्व पुरावे सीबीआयकडे द्यावेत, असे कोर्टाने यावेळी म्हटले. मुंबई पोलिसांनी आदेशाचे पालन करावे, असे निर्देशही कोर्टाने यावेळी दिले.

- Advertisement -

सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचे बॉलीवूड कलाकारांनी स्वागत केले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रीया दिल्या आहेत. कोर्टाच्या या निकालावर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेने प्रतिक्रीया दिली आहे. तिने ट्विट करत कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा –

उद्यापासून ST वाहतूक सुरू, तिकीट दराबाबत मंत्री म्हणतात…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -