घरमुंबईमूल चोरणारे पती-पत्नी अटकेत

मूल चोरणारे पती-पत्नी अटकेत

Subscribe

लहान मुले कोणाला नाही आवडत? त्यात स्वत:च्या मुलांचे सर्वांना विशेष कौतुक असते.परंतु,कधी कधी संसतीप्राप्ती सर्वांच्याच नशिबात नसते.त्यामुळे अशामुळे कधी गुन्हे हातून घडतात.अशीच एक घटना भाईंदर पुर्वेला उगडकीस आली आहे. स्वतःला मूल होत नसल्याने एका ओळखीच्या महिलेचे पाच महिन्यांचे बाळ चोरून पती-पत्नी फरार झाले होते.परंतु, नवघर पोलिसांनी शिताफीने दोघांनाही अटक करून बाळाची सुखरुप सुटका करून त्याला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. भाईंदर पूर्वेकडे राहणार्‍या कुसुम रोहित यादव ही महिला आपले पाच महिन्यांचे तान्हे मूल ओळखीच्याच संगीता सुनील राजभर हिच्याकडे ठेऊन कामाला जात होती.

कुसुमच्या बाळाचा सांभाळ करता करता संगीता आणि तिच्या पतीला बाळाची ओढ लागली. त्यातूनच संगीता आणि सुनीलने 17 डिसेंबरला कुसुमचे बाळ चोरून नेले. याप्रकरणी कुसुमने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी एक पथक तयार केले. या पथकाने संगीताला नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील बोधडी गावातून मुलासह अटक केली.तर तिचा नवरा सुनीलला बोईसर येथून अटक केली. त्यानंतर मुलाला कुसुमच्या ताब्यात देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -