घरमहाराष्ट्र‘अबॅकस’मध्ये लहानग्यांची बाजी!

‘अबॅकस’मध्ये लहानग्यांची बाजी!

Subscribe

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत येथील राजश्री लर्निंग सेंटरच्या छोट्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, विविध १२ आणि ३ उत्तेजनार्थ बक्षिसे त्यांना मिळाली आहेत. शनिवारी सायंकाळी उशिरा या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.गेल्या २४ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत देशातील ५० संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. अभ्यासात हुशार असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ‘अबॅकस’ स्पर्धा प्रतिष्ठेची असते. राजश्री लर्निंग सेंटरच्या 22 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांतून स्पर्धेत भाग घेतला. यात स्वराज दळवी (उत्कृष्ट), प्रज्ञा जाधव (उत्कृष्ट), तर श्वेत मेस्त्री याला तृतीय क्रमांक मिळाला. दुर्वा शिंदे प्रथम क्रमांक, रिद्धिमा शहासने तृतीय क्रमांक, युवांश जैन आणि मोनालिसा नायक या दोघांनाही उत्कृष्टसह द्वितीय क्रमांक, हितेश खुटिया याला दोन उत्कृष्ट आणि वैष्णवी सावंत हिला उत्कृष्टचे बक्षीस मिळाले.

जियान जैन, नक्ष जैन आणि श्वेत मेस्त्री या सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना लहान वयात स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल विशेष (उत्तेजनार्थ) बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, या स्पर्धेसाठी देशभरातून विद्यार्थी सहभागी होत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणारे यश नक्कीच समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली; तर सेंटरची जास्तीत जास्त मुले या स्पर्धेत बाजी कशी मारतील, यासाठी आमचा कायम प्रयत्न असल्याचे संचालिका राजश्री बोलके यांनी सांगितले. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या स्तरांतून कौतूक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -