घरमुंबईमाहुलवासीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी

माहुलवासीयांचे पुनर्वसन करण्याची मागणी

Subscribe

माहुलवासीयांचे पुनर्वसन करावे यासाठी एक महत्वपूर्ण बैठक घेतल्या गेली. महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

माहुलवासीयांचे पुनर्वसन करावे यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत कुर्ला येथील एचडीआयएलच्या जागेचा पर्याय सुचवण्यात आला आहे. त्यासाठी १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आ. मंगेश कुडाळकर यांनी दिली. शहरातील प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. माहुलमध्ये प्रदूषण जास्त असल्याने येथील प्रकल्पग्रस्तांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने प्रकल्पग्रस्त गेल्या १८ दिवसांपासून विद्याविहार येथील तानसा पाईपलाईन येथे आंदोलन करत आहेत.

पुनर्वसन करण्याचा निर्णय

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आयोजित केलेल्या बैठकीत कुर्ला येथील एचडीआयएलच्या संक्रमण शिबीराच्या इमारतींमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर बुधवारी, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे खा. राहुल शेवाळे, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, समिती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कुर्ला एचडीआयएलमधील १७ हजार ५०० पैकी ५५०० घरे माहुल वासियांसाठी राखीव ठेवावीत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कुडाळकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -