घरदेश-विदेश३ कोटींची संपत्ती! न्यायाधीशाला ठोकल्या बेड्या

३ कोटींची संपत्ती! न्यायाधीशाला ठोकल्या बेड्या

Subscribe

तेलंगणाच्या जिल्हा न्यायाधीशांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रंगा रेड्डी असं या न्यायधीशाचं नाव असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

३ कोटींच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणी तेलंगणाचे जिल्हा न्यायधीश रंगा रेड्डी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं की कारवाई केली असून रेड्डी यांच्या इतर ठिकाणांवर देखील धाडी टाकल्या जात आहेत. अटक केल्यानंतर रंगा रेड्डी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. रेड्डी यांच्या कमाईपेक्षा ३ कोटींची संपत्ती ही जास्त असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे. रेड्डी यांनी एवढी संपत्ती कुठून आणि कशी जमवली ? याबद्दल सध्या शोध सुरू असल्याची माहिती देखील यावेळी पोलिसांनी दिली. भ्रष्टाचार विरोधी कायद्यातंर्गत रंगा रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली. यासंदर्भात तेलंगणासह महाराष्ट्रामध्ये देखील चौकशी सुरू असून यामध्ये तेलंगणामधील ३ आणि महाराष्ट्रातील २ ठिकाणांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले रंगा रेड्डी हे पाचवे न्यायाधीश आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -