घरमुंबईआदिवासींची हिवाळ्यातच पाण्यासाठी वणवण

आदिवासींची हिवाळ्यातच पाण्यासाठी वणवण

Subscribe

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्‍या शहापूरमधील पाणीटंचाईचा प्रश्न नवीन नाही. भातसा, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा या चारही धरणा शेजारी वसलेल्या दुर्गम आदिवासी गाव पाड्यांना दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था शहापूर तालुक्यातील जनतेची आहे. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दांड आदिवासी वस्तीवर भीषण पाणी टंचाईचे चटके फेब्रुवारीच्या हिवाळ्यातच जाणवू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची ही स्थिती आणखी भीषण होणार आहे.

या वस्तीतील विहिरी कोरड्याठाक पडल्या असून येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्याच्या शोधत उन्हात वणवण भटकंती करावी लागत आहे. येथील विहिरीने फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केल्याने या विहिरीचे पाणी पुरवून पुरवून वापरण्यात येत आहे.

- Advertisement -

आदिवासी कुटुंबाला एकच हंडा पाणी
प्रत्येक आदिवासी कुटुंबाला फक्त एकच हंडा पिण्यासाठी पाणी देण्यात येईल, असा नियमही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जास्त हंडे पाणी हवे असल्यास पिण्यासाठी पाण्याचा इतरत्र शोध घेत रानोरानी उन्हातान्हात वणवण भटकंती करुन पाणी गोळा करावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आदिवासी दांड आदिवासी वाडीवर दिसत आहे असे. प्रशासनाकडुन दांड या दुर्गम आदिवासी वस्तीवर अध्यापही पाणी पुरवठ्याच्या कोणत्याच उपाय योजना करण्यात आल्या नसल्याचे येथील आदिवासींकडून सांगितले जात आहे. शहापूर तालुक्यातील चार गावे,आठ पाड्यांवर फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईचे संकट ओढावल्याचे चित्र दिसत आहे.

टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी आता होऊ लागली आहे . गेल्या काही दिवसापासूनच दांड,अजनुप, वाशाळा(बु)वाशाळा(खु)या चार गावांच्या बरोबर पारधवाडी, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वरचा गायदरा, सखाराम पाडा, राईची वाडी, चारण वाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईला सुरवात झाली आहे. या गावांना तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायत प्रशाासनाने गटविकास अधिकारी टी. ओ.चव्हाण याांच्याकडे लेखी पत्र देेऊन केली आहे. या लेेखी मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांंकडे गटविकास अधिकारी यांनी पाठविल्याची माहिती देण्यात येत आहे. सध्यातरी टँकरच्या प्रतिक्षेत आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -