घरक्रीडासुप्रिया तुपे सब-ज्युनियर महाराष्ट्र केसरी

सुप्रिया तुपे सब-ज्युनियर महाराष्ट्र केसरी

Subscribe

वर्धा जिल्ह्यात झालेल्या महाराष्ट्र महिला सब-ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिन्नरमधील सुप्रिया तुपे महाराष्ट्र केसरीच्या किताबाची मानकरी ठरली. महिला गटातून सुप्रियाच्या माध्यमातून जिल्ह्याला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे.

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. त्यात सिन्नर तालुक्यातील मौजे वेलू गावातील सुप्रिया तुपेने ६१ किलो वजनी गटात कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती आणि पुणे येथील महिला कुस्तीपटूंचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. सुप्रिया ही साकुर फाटा येथील गुरू हनुमान आखाड्यात कुस्तीचा सराव करते. ती सध्या वासुदेव अथनी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीत शिकत आहे.

- Advertisement -

सुप्रियाला कुस्ती केंद्राचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे,व्यवस्थापक चंद्रभान शिंदे, भरवीरचे सरपंच दत्तु जुंद्रे, प्रशिक्षक प्रवीण सूर्यवंशी,अप्पा धोंगडे, राष्ट्रीय कुस्तीपटू बाळु बोडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -