घरमुंबईडॉ. पायल सुसाईट नोटवरील चौकशी सुरूच

डॉ. पायल सुसाईट नोटवरील चौकशी सुरूच

Subscribe

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टरांकडे सुसाईड नोट संदर्भातील चौकशीसाठी न्यायालयाने पोलिसांना दिलेली मुदत शुक्रवारी संपली आहे. सलग पाच दिवस पोलिसांनी तुरुंगात जाऊन या तिघीकडे कॅमेरा समोर चौकशी केली, मात्र या चौकशीत तिघींची पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिलेली नसल्याचे समोर येत आहे.

गुन्हे शाखेच्या हाती या गुन्ह्यात सुसाईड नोट शिवाय कुठलाही भक्कम पुरावा मिळालेला नसून या गुन्ह्यातील तपास जवळजवळ थांबवण्यात आला आहे. पोलीस या गुन्ह्यातील आरोपपत्र तयार करण्याच्या कामाला लागले असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विशेष सत्र न्यायालयात हे आरोपपत्र सादर कऱण्यात येईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेच्या हाती डॉ. पायलने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट तिच्या मोबाईलमध्ये मिळाल्याचा खुलासा पोलिसांनी गेल्या आठवड्यात केला होता. या सुसाईड नोटमध्ये पायलने डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींच्या नावाचा उल्लेख केला आहे. विशेष सत्र न्यायालयाने सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यानच तुरुंगात जाऊन या तिघीकडे चौकशी करण्याची परवानगी पोलिसांना दिली होती.

या चौकशीची मुदत शुक्रवारी संपली असून सलग पाच दिवस पोलिसांकडून कॅमेरासमोर या तिघीची चौकशी कऱण्यात आली आहे, या चौकशीत पोलिसांनी या तिघीकडे सुसाईड नोट संदर्भात काही प्रश्न विचारले मात्र या तिघींनी याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे समजते, मात्र चौकशीत या तिघीकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्यामुळे पोलिसांचे समाधान झालेले नाही. पोलिसांचा या गुन्ह्यातील तपास जवळजवळ संपत आलेला असून हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आलेले पायलच्या हस्ताक्षरचे नमुने आणि सुसाईड नोटचे नमुने याचा अहवाल येणे बाकी असून हा अहवाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. हा अहवाल येताच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या गुन्ह्याचे आरोपपत्र कोर्टात सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -