घरमुंबईपहिल्यांदाच सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये एचआयव्हीबाधित रूग्णांसाठी 'किऑस्क'

पहिल्यांदाच सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये एचआयव्हीबाधित रूग्णांसाठी ‘किऑस्क’

Subscribe

जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी आणि पालिकेच्या वतीने इंटरॅक्टीव्ह किऑस्क मशीन एचआयव्ही बाधित रुग्णांच्या सेवेसाठी दाखल

जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी आणि पालिकेच्या वतीने एचआयव्ही बाधित रुग्णांच्या सेवेसाठी इंटरअॅक्टिव्ह किऑस्क मशीनची सुविधा देण्यात आली आहे. या मशीनमुळे, रुग्णांना उपचार, एचआयव्ही बाबत असणारे गैरसमज, समस्या या आधारीत गोष्टींवर माहिती मिळणं सोपं होणार आहे. या मशीनमध्ये काही मिनिटांचे अॅनिमेटेड व्हिडीओ तयार करुन अपलोड करण्यात आले आहेत. ज्यात वेगवेगळ्या थीम्स आहेत. जसे की, आपण सर्व एकत्र आहोत, उपचार सोपे आहेत, आपलं जीवन, चांगल्या आरोग्याची सुरुवात, औषधांचे दुष्परिणाम, औषधं वेळेवर घेण्यासाठी समय-समय कि बाते, आहार कोणत्या प्रकारचा घेतला पाहिजे, मानसिक आरोग्य, एकदा एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटीव्ह निघाली कि त्या व्यक्तिला आयुष्यभर आपलं कसं होणार याची चिंता लागते. आपल्या कुटुंबियांसोबत आपण कसं राहणार? ते कुटुंबाला सांगायचे कि नाही या छोट्या-छोट्या गोष्टींबाबतच्या समस्या जाणवतात. त्यामुळे, अशा रुग्णांनी कशापद्धतीने परिस्थितीशी दोनहात करावं याबाबतची सर्व माहिती या मशीनमधून मिळणार आहे.

हेही वाचा – ठाण्यातील मेट्रोच्या वृक्षतोडीला अखेर स्थगितीच!

प्रत्येक वयोगटानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या आजाराच्या पातळीनुसार अॅनिमेटेड व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. त्यात, एचआयव्ही आणि एड्स या दोघांमधला फरक काय आहे त्याचा ही व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या एआरटी उपचार केंद्रावर हे इंटरअॅक्टिव्ह किऑस्क मशीन बसवण्यात येणार आहे. या किऑक्समधून रुग्णांना असणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आणि माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

दोन किऑस्क मशीन एड्स नियंत्रण संस्थेत दाखल

मानसिक समस्या, उपचारांबाबतच्या समस्या, औषधांचे दुष्परिणाम या सर्व समस्यांबाबत छोट्या-छोट्या अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यात आल्या. रुग्ण जेव्हा समुपदेशकांसाठी वाट बघत असतील तेव्हा वेळेनुसार, ते किऑस्कमधले व्हिडीओ बघू शकतील. अशा दोन किऑस्क मशीन सध्या मुंबईमध्ये एड्स नियंत्रण संस्थेत दाखल झाल्या आहेत. अशा १७ मशीन्स सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत. सीएसआर निधीमधून या मशीन मागवण्यात आल्या असल्याचं मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितलं.

अनेक शंकाचं निरासन करण्यासाठी किऑस्कची मदत

उपचारांमध्ये हेळसांड होऊ नये यासाठी रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे असे एक ना अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात असतात. हे प्रश्न नक्की कोणाला विचारायचे? याबाबतच्या शंकाचं निरासन करण्यासाठी किऑस्कची फार मदत होऊ शकते. एचआयव्ही रुग्णांसाठी समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक नेमले जातात. पण, अनेक वेळा रुग्ण स्वत: ही प्रश्न विचारायला घाबरतात. अशा वेळेस किऑक्समधून प्रश्नांची उत्तर मिळणं सोप होणार असल्याचंही डॉ. आचार्य यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -