घरमुंबईमुंबईतील २१ टक्के शालेय विद्यार्थी स्थुलत्वाचे शिकार

मुंबईतील २१ टक्के शालेय विद्यार्थी स्थुलत्वाचे शिकार

Subscribe

मुंबईतील लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पटीने वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे ह्रदयरोग, हायपरटेंशन, हाइपरलिपीडेमिया, इन्सुलिनप्रतिरोध या सारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

मुंबईत बदलत चाललेली जीवनशैली आणि त्यातून स्थूलतेचं प्रमाणही वाढलं आहे. मुंबईतील लहान मुलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पटीने वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे ह्रदयरोग, हायपरटेंशन, हाइपरलिपीडेमिया, इन्सुलिनप्रतिरोध या सारख्या आजारांचा धोका वाढला आहे. बदलती जीवनशैली, जंक फूडचे सेवन तसेच व्यायामाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणासारखा आजार पहायला मिळतो. लहान मुलांमधील लठ्ठपणाबाबत जनजागृती करण्यासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून इको फॉर चेंज हे अभियान राबवण्यात आलं होतं. संपूर्ण मुंबई शहरातील १५ हायस्कूलमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

लहानपणी लठ्ठपणाचे शिकार ठरलेल्या मुलांवर शारिरीक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या विविध परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अभ्यासावर परिणाम होत असल्याचेही दिसून येते. लठ्ठपणा आता सायलेंट किलर स्वरुपात दिसून येत आहे आणि त्याबाबत जनजागृतीसाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. – डॉ. मनीष मोटवानी, ओबेसिटी सर्जन

- Advertisement -

ज्यामध्ये वयवर्षे ११ ते १५ या वयोगटातील सुमारे ९ हजार मुले (४ हजार ८०६ मुले आणि ४ हजार १९४ मुली) यांचा समावेश होता. शरीर संरचना, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), शरीराचा रंग-रुप, आजार आणि आहार यावर आधारित प्रश्नावली वापरुन वैयक्तिक मुलाखतीद्वारे माहिती गोळा करण्यात आली. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाअंती ९ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे २१ टक्के विद्यार्थ्यांचे वजन जास्त असल्याचे आढळले तर, १६ मुलं ही लठ्ठपणासारख्या आजाराने ग्रासल्याचे दिसून आले आहे.

लठ्ठपणाची लक्षणे

सर्वेक्षणानुसार, ४ हजार ८०६ मुलांमधील १ हजार २८ मुलांचे वजन जास्त असून ८१७ मुले हे लठ्ठपणाचे शिकार ठरल्याचे दिसून आले. तर, ४ हजार १९४ मुलींमधील ८०५ मुलींचे वजन जास्त असून त्यातील ६१२ मुली लठ्ठपणाने ग्रासल्याचे दिसून आले. जी मुले दोन तासांपेक्षा जास्त लॅपटॉप, टिव्ही, मोबाईलचा वापर करतात अशा मुलांची संख्या ५ हजार ३३७ (५९.३ टक्के) इतकी आणि २ तासांपेक्षा कमी वापर करणाऱ्या मुलांची संख्या ३ हजार ६६३ (४०.७ टक्के) इतकी आहे. या मुलांमध्ये आळस, श्वास घेण्यास अडचणी, अंगावरील चट्टे अशी लठ्ठपणाची लक्षणे देखील दिसून आली आहेत.

- Advertisement -

वाढत्या वजनामुळे मुलांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी पालकांनी तसेच शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावणे गरजेचे आहे आणि यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. डॉ. मनीष मोटवानी सांगतात लठ्ठपणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायामाची जोड असणे आवश्यक आहे. जीवनशैलीत अचूक बदल केल्याने लठ्ठपणासारख्या आजारांपासून दूर राहता येणे शक्य आहे.


हेही वाचा – पहिल्यांदाच सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये एचआयव्हीबाधित रूग्णांसाठी ‘किऑस्क’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -