घरमुंबईInternal Disputes In MNS : मनसेचा अंतर्गंत वाद चव्हाट्यावर; नवी मुंबईत दोन...

Internal Disputes In MNS : मनसेचा अंतर्गंत वाद चव्हाट्यावर; नवी मुंबईत दोन गटांत राडा

Subscribe

मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी नुकतेच फेसबुक लाइव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. जाधव यांच्या आरोपानंतर मनसेकडून याबाबत खुलासा करत महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या.

मुंबई : राज्यातील शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे आपण पाहले असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही दोन गट निर्माण झाली घटना आज मंगळवारी (9 जानेवारी) उघडकीस आली आहे. माथाडी कामगार नेते जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर मारहाणीचा आरोप केल्यानंतर नवी मुंबईत मनसेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याने दोन्ही गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. (Internal Disputes In MNS MNSs internal dispute on the square Rada in two groups in Navi Mumbai)

मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी नुकतेच फेसबुक लाइव्ह करून राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. जाधव यांच्या आरोपानंतर मनसेकडून याबाबत खुलासा करत महेश जाधव यांच्याबाबत कामगारांच्या अनेक तक्रारी पक्षाकडे सातत्याने येत होत्या. कामगारांची फसवणूक करून जाधव त्यांच्यावर अरेरावी करायचे त्यामुळे त्या वादातून कामगारांनीच जाधव यांना मारहाण केल्याचं मनसे प्रवक्ते योगेश चिल्ले यांची प्रतिक्रिया पुढे आली होती.

- Advertisement -

दरम्यान नवी मुंबईच्या खारघरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले महेश जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केली. याच दरम्यान कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यर्त्यांना ही मारहाण केली आहे. मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा : MLA Disqualification : निकाल देण्यात झालेल्या विलंबाचे कारण सांगताना नार्वेकरांनी NCP संदर्भात दिली माहिती

- Advertisement -

महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर ‘हे’ केले आरोप

मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष राहिलेले जाधव यांनी फेसबुक लाइव्हमधून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले की, अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी मला बेदम मारहाण केली. कसाबसा जीव वाचवून माथाडी कामगारांनी मला तिकडून पळवून आणले. या लोकांनी मला वाचवलं. राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारलं आहे. हे नेमकं काय आहे? असाही प्रश्न त्यांनी विचारला होता.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्र्यांना अध्यक्षांच्या कामाची माहिती असावी; ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपावर Rahul Narwekar संतापले

…म्हणून जाधव यांना प्रसाद दिला

घडलेल्या सगळ्या प्रकारावर मनसे नेते संदीप देशपांडे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, अमित ठाकरे यांच्याकडे महेश जाधवांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी महेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी महेश जाधवांनी त्यांना उलट सुलट उत्तरं दिली. त्यांनी ज्या शब्दांत अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला त्यावरून मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना प्रसाद दिला. अशा आशयाची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -