घरमुंबईप्रिन्सच्या निधनाची चौकशी त्रयस्थ व्यक्तीमार्फत करा

प्रिन्सच्या निधनाची चौकशी त्रयस्थ व्यक्तीमार्फत करा

Subscribe

स्थायी समितीचे महापालिकेला आदेश

केईएम रुग्णालयातील प्रिन्स राजभर या बालकाचा मृत्यू हा अपघात असल्याचा प्राथमिक स्वरुपातील अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला. परंतु प्रिन्सचे निधन ही दुर्दैवी घटना असून याची चौकशी प्रमुख रुग्णालयांचे संचालक रमेश भारमल यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असली तरी त्याबाबत स्थायी समितीने अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे ही चौकशी त्रयस्थ व्यक्तीमार्फत करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीने केली आहे. प्रिन्सला १० लाख रूपयांची मदत मुंबई महानगरपालिकेने मंजूर केली आहे.

केईएम रुग्णालयातील बालरोग रुग्ण विभागात ६ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या प्रिन्स राजभर या चार महिन्यांच्या बालकाचा ईसीजी मशिनच्या शॉटसर्कीटमुळे उजवा हात व कान भाजला. त्यानंतर हाताला गँगरिन झाल्यामुळे त्याचा हात कापण्यात आला. हृदयाला छिद्र असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु गुरुवारी मध्यरात्री या मुलाचे निधन झाले. या मृत्युचे तीव्र पडसाद स्थायी समितीत उमटले. प्रिन्सच्या मृत्यूबाबत प्रशासनाने निवेदन करावे अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी, प्रथमदर्शनी ही घटना अपघात असल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणाची नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरु आहे. तसेच मशिनचे सर्व जळालेले भाग व गादीचे भाग न्यायवैद्यक प्रयोगशाळेने नेले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे दोन्हीचा अहवाल आल्यानंतर याचे प्रमुख कारण स्पष्ट होईल. परंतु दराडे यांच्या माहितीबाबत समाधान व्यक्त न झाल्याने, सपाचे गटनेत रईस शेख यांनी या मृत्यूचे कारण स्पष्ट करावे अशी मागणी केली.तसेच चौकशीनंतर प्रिन्सच्या उपचाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार कुटुंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी हे प्रशासन संवेदनाहिन असल्याचा आरोप केला. त्यामुळे ज्या बालरोग रुग्ण कक्षात जे कर्मचारी होते, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.

प्रशासन संवेदनाहिनच नव्हेतर बेजबाबदार असल्याची टिका राष्ट्वादी काँग्रेस गटनेता राखी जाधव यांनी करत सहायक डॉक्टरांना निलंबित करावे,अशी मागणी केली तर सभागृहनेत्या विशाखा राउुत यांनी हा मृत्यू या नक्की कोणत्या कारणांमुळे झाला याची कारणे स्पष्ट करावी असे सांगत याची चौकशी बाहेरील व्यक्तींमार्फत केली जावी,अशी मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रिन्सच्या मृत्यूची कारणे पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे सदस्यांच्या मागणीनुसार त्रयस्थ व्यक्तीमार्फत याची चौकशी करून याचा अहवाल सादर करावा,असे आदेश देत न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवालही समितीला सादर केला जावा,असे आदेश प्रशासनाला दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -