घरमुंबईएकाला न्याय... दुसर्‍यावर अन्याय

एकाला न्याय… दुसर्‍यावर अन्याय

Subscribe

सुरक्षा मंडळाचे कर्मचारी पगाराविना ?

ठाणे पालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पूर्वीच्या भांडुप सुरक्षा मंडळाच्या रक्षकांना तीन महिन्यांपासून पगार नसल्याने ते कर्ज घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, तर नव्याने नियुक्त केलेले महाराष्ट्र सुरक्षाबल सुरक्षा रक्षकांना मात्र आगाऊ रक्कम दिल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे कृष्ण पाटील, राष्ट्रवादीचे शानू उर्फ अशरफ पठाण यांनी सभागृहात केला. त्यानंतर स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी यापुढे सुरक्षा रक्षकांचे पगार थांबवण्यात येऊ नयेत, वेळेवर पगार द्यावा, असे आदेश पालिका प्रशासनाला दिले.

ठाणे पालिकेच्या मालमतेच्या संरक्षणासाठी भांडुप बोर्डाचे जवळपास ३५० सुरक्षा रक्षक कार्यरत असताना महाराष्ट्र सुरक्षा बल या एजन्सीची सुरक्षा महापालिकेने महासभेत मंजूर केली. त्यानंतर या सुरक्षा कर्मचार्‍यांना नियुक्त करण्यात आले. मात्र, जुन्या आणि तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करणारे भांडुप बोर्डाचे सुरक्षा रक्षक यांना जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचा गौप्यस्फोट कृष्ण पाटील यांनी केला. त्याला राष्ट्रवादीचे अशरफ उर्फ शानू पठाण यांनी दुजोरा दिला. जर भांडुप सुरक्षा रक्षकांच्या दिमतीवर पालिकेच्या मालमत्तेची सुरक्षा शक्य असताना या अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची आवश्यकता काय आहे? असा सवालही स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावर प्रशासनाने खुलासा करताना सांगितले. भांडुप बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांचा जून, जुलै महिन्याचा पगार देण्यात आला आहे, तर ऑगस्ट महिन्याचा पगार काढण्यात आला असून तो लवकरच होईल असे उत्तर दिले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -