घरमुंबईकोट्यवधींच्या खर्चानंतरही कळवा हॉस्पीटल आजारीच

कोट्यवधींच्या खर्चानंतरही कळवा हॉस्पीटल आजारीच

Subscribe

भाजप नगरसेवकाने दाखविला व्हिडियो

पालिकेच्या कळवा रुग्णालयात मनुष्यबळ, साफसफाई, धोकादायक इमारत, वैद्यकीय कॉलेजच्या वसतिगृहाची दुर्दशा अशा नाना दुरावस्थेच्या गर्तेत अडकलेले आहे. या दुरावस्थेच्या कथनाचा व्हिडियोच सभागृहात भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी दाखविल्याने एकच खळबळ उडाली. रुग्णालयाच्या दुरावस्थेची कबुली रुग्णालयाचे डीन संध्या खडसे यांनी व्हिडियो आणि सभागृहात मंगळवारी दिली. यामुळे प्रशासनावरच्या आरोपामुळे प्रशासन निरुत्तर झाले. विशेष म्हणजे डीन संध्या खडसे यांनी प्रसारमाध्यमांना कोणाच्या परवानगीनी माहिती दिली? अशी सभागृहात विचारणा करत त्यांच्यावर थेट कारवाईची मागणीचा सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून सभागृहात करण्यात आली.

कळवा रुग्णालयाची इमारत 25 वर्ष जुनी झाल्याने धोकादायक झाली असल्याची कबुली कळवा रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी दिल्याने त्याचे पडसाद मंगळवारी महासभेत उमटले. यात केलेले आरोप हे खरे कि खोटे असे विचारले असता त्यांनी हे आरोप खरे असल्याचे सांगिल्याने प्रशासन अडचणीत आले.

- Advertisement -

दुसरीकडे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी खडसे यांची बाजू लावून धरीत ही बाब खरी असून रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळेच त्यांनी आपल्या मनातील व्यथा अशा पद्धतीने मांडली असल्याने त्यात चुकीचे काहीच नाही, असेही स्पष्ट केले. मात्र नंतरच्या चर्चेत हा प्रश्न भरटकल्याने मूळ विषय आणि समस्या बाजूलाच राहिल्याचा प्रकार घडला.

मृतदेह हवा तर रक्तदान करा ?
या निमित्ताने कळवा रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक आरोप करण्यात आला. एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचे बिल 8 हजार झाले होते. त्यामुळे ते बिल भरण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाकडून संबंधितांना करण्यात आल्या होत्या. परंतु आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी चार हजार भरण्याची तयारी दर्शविली. यावर येथील डॉक्टरांनी मग तुम्ही आधी रक्तदान करा, मगच मृतदेह घेऊन जा असा
अजब सल्ला दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -