घरमुंबईमेट्रो 3 कारशेड आरे मध्येच

मेट्रो 3 कारशेड आरे मध्येच

Subscribe

कांजुर मार्गला कारशेड अशक्य

मेट्रो 3 प्रकल्पाअंतर्गत कारशेड हे नियोजित ठिकाणी म्हणजे आरे येथेच होणार असल्याची स्पष्टक्ती मुंबई मेट्रो रेल विकास कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी आज दिली. आदित्य ठाकरे यांच्या मेट्रो कारशेड कांजुरमार्गला हलवण्याच्या सल्ल्याचाही त्यांनी आपल्या शैलीतच समाचार घेतला. तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या व्यक्ती या आता कारशेडबाबत बोलू लागल्या आहेत असा टोला त्यांनी आपल्या सादरीकरणा दरम्यान लगावला. टुगेदर व्ही कॅन सोशल संचार या संस्थेकडून आयोजित मुंबई मेट्रो शहरी वाहतुकीचा कायापालट कसा करणार या व्याख्यानात त्या बोलत होत्या.

मेट्रो 3 साठी कारशेडबाबतचा निर्णय हा सर्वेक्षणाच्या आधारावर पुर्ण झालेला आहे. मेट्रो 3 कारशेडच्या जागेनुसार तब्बल 50 मेट्रो ट्रेन इतर कोणत्याही ठिकाणी हलवण हे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मेट्रो 3 चे कारशेड नियोजित ठिकाणीच होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कारशेड ही आरेच्या ठिकाणी उभारण्यासाठी कोणताही आर्थिक फायदा किंवा हित याचा काहीही संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आरे कारशेडच्या निमित्ताने सगळ्या अफवा पसरवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरे कारशेडच्या जागेसारखा मुंबईत इतर कोणताही पर्याय आहे. त्यामुळेच आरेच्या जागेची निवड केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

झाडांच्या पुर्नरोपणाचा पर्याय आव्हानात्मक
मुंबईत आरे कारशेडच्या ठिकाणच्या झाडांची कत्तल करण्याएवजी त्या झाडांचे पुर्नरोपण का करण्यात येत नाही असाही सवाल यावेळी करण्यात आला. आतापर्यंत 1500 झाडांचे पुर्नरोपण करण्यात यश आले आहे. मात्र पुर्नरोपणाचा पर्याय हा सोपा नसल्याच खुलास त्यांनी केला. पुर्नरोपणाचा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. अनेकदा झाडांची मुळ ही रस्त्याखाली तसेच अनेक सेवा पुरवठादार कंपन्यांच्या वाहिन्यांच्या मुळाशी गेलेली असतात. अशावेळी त्या सगळ्या वाहिन्यांच्या विळख्यातून झाड काढून पुर्नरोपण करणे हे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नव्या झाडांची लागवड करताना 25 हजार नवीन झाडे आम्ही लावली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -