घरमुंबईस्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात कल्याण-डोंबिवलीची ठाण्यावर मात

स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात कल्याण-डोंबिवलीची ठाण्यावर मात

Subscribe

कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर या शहरांनी ठाण्याच्या तुलनेत पिछाडीवर असलेल्या शहरांनी स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे.

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात ठाणे शहराची जोरदार घसरगुंडी झाली आहे. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश आणि मोठ्या सोसायट्यांमधील कचरा वर्गीकरणाला दिलेली स्थगिती, यामुळे ठाण्याला फटका बसला आहे. मात्र कल्याण-डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर या शहरांनी ठाण्याच्या तुलनेत पिछाडीवर असलेल्या शहरांनी स्वच्छतेच्या बाबतीत गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली आहे. कल्याण-डोंबिवली २३३ स्थानावरून ७७ स्थानावर आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण-डोंबिवली हे स्वच्छ शहर टिप्पणी केली होती. अस्वच्छ शहराचा बसलेला डाग जिव्हारी लागल्याने दोन्ही शहरांनी २०१९ च्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात ७७ वा क्रमांक प्राप्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी २०१७ साली या दोन्ही शहरांनी याच यादीत २३७ वा क्रमांक प्राप्त केला होता, तर गतवर्षी ९७ वा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे स्वच्छतेच्या आघाडीवर अन्य शहरांच्या तुलनेत कल्याण डोंबिवली पिछाडीवर हेाती. आता चांगली कामगिरी केल्याची मोहोर उठवली आहे. स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात गेल्या वर्षी ठाणे शहर ४०व्या स्थानावर होतं. तर यावर्षी ५७ व्या स्थानावर घसरगुंडी झाली आहे.

- Advertisement -

घनकचरा प्रकल्पामुळे गुण घटले

कल्याण-डोंबिवली शहरांनी चार हजार शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत यंदा ७७ वे स्थान मिळवले असले, तरी घनकचरा प्रकल्प मार्गी लागला नसल्याने महापालिकेचे गुण घटले आहे. अन्यथा पहिल्या ५० शहरांत येण्यासाठी महापालिका पात्र ठरली असती. कल्याण-डोंबिवली शहरांची लोकसंख्या १५ लाखांपेक्षा जास्त आहे. अस्वच्छतेचा डाग पुसून काढण्याच्या दिशेने केडीएमसी हळूहळू वाटचाल करीत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

२० व्या क्रमांकासाठी २० वर्षे : विरोधी पक्षाचा टोला

केडीएमसीचा ७७ वा क्रमांक ही सत्ताधाऱ्यांसाठी आनंदाची बाब असली तरी आमच्या दृष्टीने ती खेदाचीच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही स्वच्छतेच्या बाबतीत एवढ्या कमी वेगाने होणारी प्रगती निश्चितच कौतुकास्पद नाही. मात्र पहिल्या २० क्रमांकावर येण्यासाठी आणखी २० वर्षे लागणार का? असा टोला पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -