घरमुंबईकल्याण स्थायी समितीत कोट्यावधींची लगीन घाई

कल्याण स्थायी समितीत कोट्यावधींची लगीन घाई

Subscribe

निवडणूक आचारसंहितेच्या भीती पोटी कोट्यवधींच्या कामांना मंजुरी देण्यासाठी केडीएमसीने बैठकांचा सपाटा लावला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवडयात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आचारसंहितेच्या भितीपोटी कोटयावधी रूपयांच्या कामे मंजूर करण्याची लगीनघाई स्थायी समितीला लागली आहे. त्यामुळे स्थायी समितीने बैठकांचा सपाटा लावला आहे. गुरूवारी बजेट सादर केल्यानंतर शुक्रवारी स्थायी समितीची सभा पार पडल्यानंतर आता शनिवारीही स्थायी समितीची सभा लावण्यात आली आहे.

प्रस्ताव मंजूरीचा सपाटा

स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी म्हणूनच ओळखली जाते. महापालिकेला कोणत्याही विकास कामांच्या आर्थिक मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवावा लागतो. स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी गुरूवारी २१०० कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. त्याच सभेत अंदाजपत्रक मंजूरही करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यांनतर स्थायी समिती अथवा महासभा होणार नाही. आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते, असे संकेत शासकीय व प्रशासकीय पातळीवरून मिळत आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच आर्थिक प्रस्ताव मंजूर करण्याची घाई दिसून येत आहे. शुक्रवारच्या स्थायी समितीच्या सभेत ५ कोटींची कामे मंजूर केली. शनिवारीही स्थायी समितीची सभा बोलावण्यात आली आहे. या सभेतही लाखो रूपयांचे प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लागोपाठ स्थायी समितीच्या सभा लावून आचारसंहितेच्या नावाखाली कोटयावधी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा सुरू असल्याचेच दिसून येतय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -