घरमहाराष्ट्रचिक्कीनंतर मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेवर आरोप

चिक्कीनंतर मोबाईल खरेदीत १०६ कोटींचा घोटाळा; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेवर आरोप

Subscribe

विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मोबाईल खरेदीत तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे आधी चक्की घोटाळा आणि आता मोबाईल घोटाळा यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरोधकांच्या रडारवर आहेत. काही महिन्यांपूर्वी महिला आणि बाल विभागाने अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना बेस्ट अँड्रॉइड फोन देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याला मंजुरी देखील देण्यात आली. यानुसारजवळपास १ लाख २० हजार ३३५ फोन विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल घेताना ना सरकारने आणि ना संबंधित विभागाच्या मंत्र्याने संबंधित कंपनीच्या मोबाईलची पाहणी देखील केली नसल्याचा आरोप धंनजय मुंडे यांनी केला आहे.

एका फालतू कंपनीला दिला ठेका

सगळ्यात महत्वाचे म्हणजे महिला आणि बाल विकास विभागाने बंगलोर मधील सिसटेक या कंपनीला एवढे मोठे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. ज्या सिसटेक कंपनीला हे कंत्राट देण्यात आले त्याची कॅपिटल शेअर हे ५ कोटी इतका आहे तरी देखील एवढी मोठी ऑर्डर देण्याचा निर्णय का घेण्यात आला असा सवाल धंनजय मुंडे यांनी विचारला. Panasonic aloga i7 मोबाईल ८ हजार ७७७ प्रति या दराने विकत घेतले. यासाठी १०६ कोटी ८२ लाखांचा खर्च केला.पण हा मोबाईल ६ हजार ते ६४०० रुपयाला ऑनलाईन मिळतो तो ८ हजार ७७७ ला का विकत घेतला गेला? असा सवाल धंनजय मुंडे यांनी विचारला आहे. तसे याच कंपनीकडून हा मोबाईल घेण्याचा घाट का घातला? असा सवाल देखील मुंडे यांनी यावेळी विचारला.

- Advertisement -

सगळ्यात महत्वाचे म्हणजे एवढी ऑर्डर एखादया कंपनीला दिली तर सूट ही नक्कीच मिळते पण इकडे सूट तर सोडाच स्वस्त मोबाईल महागात घेतलाय आणि ज्या मोबाईलला लोकांनी मार्केटमध्ये नाकारले त्यासाठी एवढा खर्च केला यामध्येच काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप धंनजय मुंडे यांनी केला. १०६ कोटी रुपयाला खरेदी केलेल्या या मोबाईलमध्ये ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील धंनजय मुंडे यांनी केला. ठराविक कंपनीला फायदा देण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने हा निर्णय घेतलयाचा आरोप देखील त्यांनी केला.

आता तरी कारवाई करा

आम्ही एवढे घोटाळे काढले पण मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही. बहुदा मुख्यमंत्रीनी त्याच्या मंत्र्याला सांगितले असेल तुम खाते रहो हम सभालते रहेंगे असा आरोप धंनजय मुंडे यांनी यावेळी केला. तसेच आता तरी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -