घरमुंबईकल्याणची शिवसेनेची दहीहंडी रद्द

कल्याणची शिवसेनेची दहीहंडी रद्द

Subscribe

राज्यावर अस्मानी संकट कोसळल्याने यंदा शिवसेनेने कल्याणच्या मानाच्या दहीहंडीची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात आज, उद्या दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. मुंबईसह मुंबई उपनगरे, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये तर दरवर्षीच खूप धुमधडाक्यात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येतो. पण यंदा राज्यावर अस्मानी संकट ओढावले आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रमुख दहीहंडी आयोजकांनी यंदा साधेपणाने दहीहंडी सण साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यातून येणारी रक्कम राज्यातील पूरग्रस्तांना दान करण्याची भूमिका काही दहीहंडी आयोजकांनी घेतली आहे. त्यानुसार राज्यावरील अस्मानी संकटामुळे कल्याण शिवसेना शहर शाखने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. दहीहंडीची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

हेही वाचा – एसटीच्या बसचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती

दहीहंडीची रक्कम पूरग्रस्तांना

शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने दरवर्षी शिवाजी चौकात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. कल्याण शहराची मानाची दहीहंडी ओळखली जाते. २५० ते ३०० दहीहंडी पथके दरवर्षी सहभागी होत असतात. मात्र यंदाच्या वर्षी सांगली, कोल्हापूर, कोकणसह राज्यभरात विविध ठिकाणी महापूराने हाहाकार उडवला. नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे बळी जाऊन कित्येकांचे संसार उघड्यावर पडले. त्यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून ती रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -