घरमुंबईमुंबईतील विशेष मुलांसाठी विशेष हंडी; शाळेचा पुढाकार

मुंबईतील विशेष मुलांसाठी विशेष हंडी; शाळेचा पुढाकार

Subscribe

मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या श्रीमती कमला मेहता ही अंध मुलांची शाळा असून शाळेतर्फे या विशेष मुलांसाठी गोकुळाष्टमीनिमित्त दहहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या श्रीमती कमला मेहता ही अंध मुलांची शाळा असून शाळेतर्फे या विशेष मुलांसाठी गोकुळाष्टमीनिमित्त दहहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहीहंडी या सणात प्रत्येकाला सहभागी होता यावं या उद्देशाने ही विशेष मुलांची दहीहंडी ठेवण्यात आली होती. आपल्या जीवनातील अंधार काही काळासाठी का होईना दूर करता यावा या उद्देशाने शाळेतून, असे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक दहिहंडीचा उपक्रम.

- Advertisement -

निरागस हास्य, मनात काहीतरी करुन दाखवायची जिद्द, खांद्याला खांदा देणारे सवंगडी आणि एकावर एक अगदी सर्राईतपणे चढणारे गोविंदा. मग त्या मुली असो किंवा मुलं. सर्व एक समान. या मुलांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. त्यांच्या ‘डोळस’ उत्साहात अंधत्वाचा अडथळा येऊ नये म्हणून त्यांचे आई-वडील ही या उत्साहात अगदी लहान मुलाप्रमाणे सहभागी झाले. अंधाराने कमी केलेला आत्मविश्वास परत मिळावा यासाठी त्यांचे कुटुंबिय त्यांना नेहमीच साथ देतात.

- Advertisement -

दरवर्षीप्रमाणे यंदाही या मुलांसाठी शाळेतर्फे दहीहंडीचा कार्यक्रम शाळेच्या परिसरात ठेवण्यात आला होता. जवळपास ४० ते ४५ मुलांचा सहभाग होता. त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक ही कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांचा दहीहंडी फोडतानाचा उत्साह, त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य हे ते किती विशेष आहेत हे दाखवून देतात, असं शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -