घरमुंबईडोंबिवलीत मनसेची इव्हीएम हंडी; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २ लाख ५१ हजार!

डोंबिवलीत मनसेची इव्हीएम हंडी; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २ लाख ५१ हजार!

Subscribe

ईव्हीएमला वाढता विरोध पाहाता डोंबिवलीमध्ये मनसेने ईव्हीएमचीच दहीहंडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इव्हीएम विरोधात दंड थोपटले असतानाच, आता डोंबिवलीत मनसैनिक इव्हीएमची हंडी फोडणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेने दहीहंडीचा महोत्सव रद्द केला असून, दही हंडीची सुमारे २ लाख ५१ हजाराची रक्कम पूरग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून देण्यात येणार आहे. इव्हीएमची हंडी उभारण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान व्हावे अशी मनसेची मागणी असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.


राज ठाकरे म्हणतात, ईव्हीएम घोटाळ्यात भाजपने सेनेच्या ४ जेष्ठ नेत्यांना पाडले!’

दोन थराची इव्हीएम हंडी!

देशभरात इव्हीएम मशीन वापरावर प्रचंड नाराजी पसरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी इव्हिएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरचा वापर करावा अशी मागणी अनेक राजकीय पक्षांकडून होत आहे. यंदा अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगली आणि कोकणात नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा नवनिर्माण दहीहंडी करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्या बदल्यात २ लाख ५१ हजार रकमेची मदत पूरग्रस्त निधी म्हणून देण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील दरवर्षी ज्या ठिकाणी नवनिर्माण दहिहंडी गोविंदा पथक फोडत होते. त्या ठिकाणी प्रतीकात्मक इव्हीएम मशीन दहीहंडी लावण्यात येणार आहे. ही दहीहंडी गोविंदा पथक फोडणार नसून मनसैनिकच फोडणार आहेत. ही हंडी फार उंचावर न बांधता एक ते दोन थरांची ही दहीहंडी असणार आहे. यावेळी मनसेचे नेते राजू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -