घरमहाराष्ट्रसर्वसामान्यांना दिलासा, भाजीपाल्याच्या दरातील घसरणीला सुरुवात

सर्वसामान्यांना दिलासा, भाजीपाल्याच्या दरातील घसरणीला सुरुवात

Subscribe

महागाईमुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसलेली असताना आता एक मोठी माहिती समोर आली आहे. बाजारांमध्ये आता भाजीपाल्याची आवक वाढलेली असल्याने भाजीपाल्यांच्या दरामधील घसरणीला सुरुवात झाली आहे.

मुंबई : महागाईमुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसलेली असताना आता एक मोठी माहिती समोर आली आहे. बाजारांमध्ये आता भाजीपाल्याची आवक वाढलेली असल्याने भाजीपाल्यांच्या दरामधील घसरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गगनाला भिडलेले भाज्यांचे दर कमी होणार आहेत. गेल्या महिन्याभरात सर्वसामान्यांच्याच नाही तर श्रीमंतांच्या ताटातून देखील काही भाज्यांसह टोमॅटो गायब झालेला पाहायला मिळाला. यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने आणि काही भागांत सतत मुसळधार पाऊस कोसळल्याने भाजीपाल्याची बाजारातील आवक कमी झाली होती. त्यामुळे 30 रुपये किलोने मिळणारी भाजी थेट 100 रुपये किलोंच्या घरात पोहोचली होती. (fall in vegetable prices has started)

हेही वाचा – Kitchen Tips : किचन साफ करताना ‘या’ टिप्स करा फॉलो…

- Advertisement -

दरवेळी कांद्याचे भाव सामान्यांना रडायला भाग पाडतात. पण गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या भावाने सामान्य माणसाला रडायला लावले. टोमॅटोचे दर 200 रु. किलो झाल्याने अनेकांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली होती. पण आता 50 रुपये किलोने टोमॅटोची विक्री करण्यात यावी, असे आदेशच केंद्रातून सोडण्यात आले आहेत. तर पालेभाजीची एक जुडी 50 रुपये किलोने बाजारात विक्रीसाठी असल्याने सामान्यांनी याकडे देखील कानाडोळा करत पालेभाजी खाणे सोडले होते.

भाजीपाला स्वस्त झाल्याने किचनमधील आर्थिक बजेट सांभाळणार्‍या गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वच भाज्यांचे दर आवाक्यात असल्याने किचनमध्ये सर्वच भाज्यांना स्थान मिळणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे शेतकरी मात्र पुन्हा त्रासला जाणार आहे. तर येत्या काही महिन्यात डाळींच्या भावात देखील वाढ होणार आहे. बाजारात तुरडाळ, मूगडाळ तसेच इतर डाळींचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांच्या खिशाला पुन्हा कात्री बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले भाजीपाल्यांचे भाव आता कमी होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या ताटातून हद्दपार झालेला टोमॅटो सुद्धा लवकरच पुन्हा त्यांच्या ताटात दिसू लागणार आहे.

- Advertisement -

सध्या बाजारामध्ये टोमॅटो 100 रुपये किलो, मटार 100 रुपये किलो, शिमला मिरची 60 रुपये किलो, हिरवी मिरची 60 ते 80 रुपये किलो, गवार आणि चवळीच्या शेंगा 80 रुपये किलोने मिळत आहेत. त्यामुळे आता यांचे देखील भाव कमी होणार आहेत. तर कांद्याची आवक कमी झाल्याने पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -