Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र रस्त्यांच्या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलोय; राज ठाकरेंनी घातला थेट विषयला हात

रस्त्यांच्या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आलोय; राज ठाकरेंनी घातला थेट विषयला हात

Subscribe

राज ठाकरे यांनी सरकारवर रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरून जोरदार टीका केली आहे. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी विषयाला हात घातला. मुंबई- गोवा महामार्ग अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत असल्यानं, त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्रा डागलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा आहे. या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी सरकारवर रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरून जोरदार टीका केली आहे. भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी विषयाला हात घातला. मुंबई- गोवा महामार्ग अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत असल्यानं, त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. सोबतच त्यांनी भाजपसहित अजित पवारांना सुनावलं आहे. थेट सरकारला अल्टिमेटम देत, रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आंदोलन करण्यासाठी तुम्हाला हिरवा झेंडा दाखवायला आलोय, असं म्हणत त्यांनी सरकारविरोधात आंदोलनाचा बडगा उभारला आहे.  ( Maharashtra Navnirman Sena MNS president Raj Thackeray is hold MNS determination meeting at Panvel s Vasudev Balwant Phadke Auditorium )

मागच्या 16 वर्षांपासून मुबंई-गोवा महामार्गाचं काम सुरू आहे. आतापर्यंत या मुंबई- गोवा महामार्गावर 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत, राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरेंनी थेट विषयाला हात घालत आतापर्यंत राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांना खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, मुंबई-गोवा या रस्त्यावर आतापर्यंत 15 हजार 566 कोटी खर्च झाले आहेत. रस्ता नाही झाला बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. यावर गडकरींशी बोललो, तर ते म्हणाले कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेले. यामागे काही कारण कर नाही ना, कोणाचं काम कर नाही ना…

कोकणातील जमिनी इतरांच्या घशात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या? कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत. कुंपण शेत खातं आहे, आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात.

- Advertisement -

राज ठाकरेंनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सांगताना म्हणाले की, चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्रीात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

तसंच, राज ठाकरे यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. या मेळाव्यात प्रलंबित मुंबई- गोवा महामार्गासंदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली. मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, शिवसेना भाजपनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आली, आता तर सगळेच आले कळत नाही कोण आलं. पण लोकांना तुम्ही कसे काय यांना मतदान करतात? आम्ही खड्ड्यातून गेलो काय किंवा खड्ड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का, यांना एकदा धडा शिकवायला हवा, नुसती आश्वासनं देतात, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.

- Advertisment -