घरमुंबईदोन महिने पगार नाही; कामा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा निषेध

दोन महिने पगार नाही; कामा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा निषेध

Subscribe

कामा हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि परिचारिका यांनी आपल्या थकीत वेतनासाठी हॉस्पिटलच्या आवारात निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला आहे.

मुंबईच्या कामा हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि परिचारिका यांनी आपल्या थकीत वेतनासाठी हॉस्पिटलच्या आवारात निदर्शने करत प्रशासनाचा निषेध केला. गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार रखडला असून प्रशासनाकडून ठोस कारण देण्यास दिरंगाई होत असल्याने सोमवारी कर्मचारी एकत्र आले. कामा हॉस्पिटल परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मे आणि जून या दोन महिन्यांचा पगार मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे.


हेही वाचा – महिला शिक्षकांचे भरपावसात आंदोलन

- Advertisement -

कामा हॉस्पिटलमध्ये २५० परिचारिका आणि २०० अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. पण या सर्वांना अद्याप पगार मिळालेला नाही. गेले अनेक दिवस हॉस्पिटल प्रशासनाकडे पगार तातडीने देण्यात यावा, यासाठी कर्मचारी मागणी देखील करत आहेत. पण, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्यामुळे परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या आवारात निदर्शने केली आहेत.

मागील दोन महिने परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे. मे महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नाही. तर जुलै महिना संपायला आला तरी पगार झालेला नाही. याबाबत प्रशासनाला विचारले असता तांत्रिक अडचणी असल्याचं कारण देण्यात येत आहे. यासंदर्भात कंटाळून आम्ही वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमिता जोशी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहोतकृष्णा क्षीरसागर, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समिती कोषाध्यक्ष

- Advertisement -

पगार मिळाला नसल्याने सर्व परिचारिका नाराज आहेत. पण, प्रशासन याची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. अतिरिक्त कामही परिचारिकांना करावं लागत आहे. पण, तरीही हक्काचा पगार मिळावा यासाठी निदर्शनं करावी लागतात याचीच खंत वाटते, अशी माहिती एका परिचारीकेने नाव न सांगण्याच्या अटीवरुन दिली.


हेही वाचा – अल्पवयीन मुलाचे महिलांच्या ‘फर्स्ट क्लास’ डब्ब्यात हस्तमैथुन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -