घरताज्या घडामोडीकडोंमपा आयुक्तांना झटका; परवानगी नसतानाही गाडीवर लावलेले लाल दिवे काढले!

कडोंमपा आयुक्तांना झटका; परवानगी नसतानाही गाडीवर लावलेले लाल दिवे काढले!

Subscribe

काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या गाड्यांवर लाल दिवे लावण्याची परवनगी होती. मात्र, केंद्र सरकारने त्या संदर्भातला नवा नियम जाहीर करत कुणाला लाल दिव्याची गाडी वापरता येईल, याची एक नियमावलीच जारी केली. परवानगी असलेल्या व्यक्तींच्या यादीतून प्रशासकीय अधिकारी, आयएएस, आयपीएस यांना वगळण्यात आलं. त्यामुळे या अधिकाऱ्यांना त्यांच्या गाडीवर लाल दिवे लावण्याची परवानगी नाकारण्या आली. मात्र, असं असूनही कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आपल्या गाडी क्रमांक MH05-DZ-5111 आणि MH05-P-0550 या गाड्यांवर लाल दिवे लावणं सुरूच ठेवलं होतं. मात्र, यासंदर्भातली तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे दाखल केल्यानंतर हे दिवे आता काढण्यात आले आहेत.

यासंदर्भात कौस्तुभ गोखले यांनी परिवहन मंत्री आणि परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

kdmc commissioner letter

kdmc commissioner letter 1

- Advertisement -

२०१७पूर्वीपर्यंत गाडीवर लावलेले लाल दिवे हे स्टेटसचं प्रतीक मानलं जात होतं. प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री, लाल दिव्याच्या गाड्यांमध्ये फिरत असत. मात्र, २० एप्रिल २०१७ रोजी केंद्रीय परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार फक्त अॅम्ब्युलन्स, आपातकालीन सेवा, अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या यांनाच लाल दिवा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. अगदी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या गाड्यांवरचेही लाल दिवे काढण्यात आले आहेत. १ मे पासून हा नियम देशभरात लागू करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -