घरCORONA UPDATEUnlock: 'या' राज्यात सोमवारपासून सुरू होणार मॉल्स, दुकाने

Unlock: ‘या’ राज्यात सोमवारपासून सुरू होणार मॉल्स, दुकाने

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च पासून लॉकडाऊन असलेला देश आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काही राज्यांनी टप्प्याटप्प्याने कामकाजाला सुरूवात करण्याची परवानगी दिली असून देश अनलॉकच्या दिशेने पाऊल टाकत आहे. यातच हरयाणातील गुडगावमध्ये पुढील आठवड्यापासून मॉल्स आणि दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरामध्ये मॉल्स आणि दुकाने सुरू करता येणार आहेत. हरयाणातील गुडगाव महनगरपालिकेच्या आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच मॉल्स आणि दुकानांनी मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास त्यांना ती बंद करावी लागतील, असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -

देशात काल २ लाख १५ हजार ४४६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत ७७ लाख ७६ हजार २२८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने दिली आहे. देशात सतत कोरोनाबाधित नव्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशात १७ हजार २९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ९० हजार ४०१वर पोहोचला आहे. तर यापैकी आतापर्यंत १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या १ लाख ८९ हजार ४६३ जणांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत २ लाख ८५ हजार ६३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा –

मुंब्र्यात एकाच दफनभूमीत १४२ मृत्यू, मग ठाण्यात फक्त २७७ कसे? – किरीट सोमय्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -