घरमुंबईमहिला अनुभवणार लोकलमध्ये निसर्गरम्य वातावरण

महिला अनुभवणार लोकलमध्ये निसर्गरम्य वातावरण

Subscribe

मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल आता तुम्हाला नव्या रुपात दिसणार आहे. विशेषत: महिलांच्या डब्ब्यात हे बदल करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास हा रंगीबेरंगी चित्रांच्या साहाय्याने अधिक सुखकर होण्यासाठी मदत होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी ही खुषखबर असून निसर्गचित्रांनी सजलेल्या सुंदर डब्यातून लवकरच महिला प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या सजावटीत चित्रांनी सजवलेल्या दोन डब्यांचा समावेश आहे. हे दोन्ही डबे महिला प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहेत. लोकलच्या डब्ब्यांना गुलाबी आणि हिरव्या रंगाचा वापर करुन निसर्ग चित्र रेखाटण्यात आली आहे.

निसर्गचित्रांचा साज उमटलेले डबे

हिरव्या आणि गुलाबी रंगछटांच्या पार्श्वभूमीवर फुलपाखरे, रंगीबेरंगी फुलांनी सजलेले दोन डबे पूर्णपणे तयार करण्यात आले आहेत. निसर्गचित्रांचा साज उमटलेले दोन्ही डबे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. काही दिवसांतच हे डबे प्रत्यक्ष रुळांवर धावणार आहेत. माटुंगा कार्यशाळेत या डब्यांना नवीन रंगरुप देण्याचे काम होत असून हे काम पूर्णत्वास आले आहे.

- Advertisement -

माटुंगा कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग

लोकल सेवेवरील हा पूर्णपणे नवीन प्रयोग मानला जात आहे. रेल्वे डब्यांतील अंतर्गत भागात रंगरुप देण्याची पद्धत ठरलेली आहे. पण, मध्य रेल्वेने या दोन डब्यांसाठी नियमांना बाजूला सारून नवीन प्रयोग हाती घेतला आहे. प्रवासातील ताण विसरण्यासाठी डोळ्यांना सुखावणारे हे रंग पूरक ठरतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या डब्यांना नवीन साज देण्याच्या कामासाठी माटुंगा कार्यशाळेतील अमोल धाबडे, चंदू अगुरु या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कल्पकतेतून रंगात सजलेले डबे मध्य रेल्वेवरील कुतुहूलाचा विषय ठरणार आहे. या प्रयोगानंतर भविष्यातही त्याच पद्धतीने रंगछटांनी सजलेले डबे सेवेत आणले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -