घरमनोरंजनबानू साकारणार 'शनया'ची भूमिका

बानू साकारणार ‘शनया’ची भूमिका

Subscribe

'जय मल्हार' या मालिकेमधील बानू ही आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बानू आता चक्क अल्लड शनयाची भूमिका साकारणार आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठीवरील गाजलेल्या मालिकेमधली ‘शनया’ या पात्रातून खूपच लोकप्रिय झाली आहे. सर्वांच्या घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शनया या मालिकेमध्ये खलनायकाची भूमिका साकारत असून ती त्यात चांगलीच झळकली आहे. रसिका खलनायकाची भूमिका जरी साकारात असली तरी तिलाच प्रेक्षकांचं सर्वात जास्त प्रेम मिळत आहे. मात्र आता प्रेक्षकांच्या लाडक्या शनयाची भूमिका ‘जय मल्हार’ फेम बानू साकारणार आहे.

mazhya navryachi bayko will get new shanaya
(फोटो सौजन्य : Facebook)

शनया का सोडते मालिका?

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमधली रसिका सुनिल तिच्या पुढील शिक्षणासाठी परदेशात गेली असल्यामुळे तिला मालिकेतून अर्ध्यावरुन एक्झीट घ्यावी लागत आहे. आता बानू म्हणजेच अभिनेत्री इशा केसकर हिची शनया म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेमध्ये गॅरी गॅरी करणारी शनयाची भूमिका अभिनेत्री इशा केसकर साकारणार आहे.

- Advertisement -
isha keskar
(फोटो सौजन्य : Facebook)

बानूला होणार ‘जय मल्हार’ मालिकेचा फायदा

‘जय मल्हार’ या मालिकेमधील बानू अभिनेत्री इशा केसकर हिला शनयाची भूमिका साकारण्यासाठी फायदा होणार आहे. आता नवीन शनयाची एंट्री देखील मोठ्या दणक्यात होणार असल्याचं कळत आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या महाएपिसोडमधून ही नवीन ‘शनया’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता बानू शनयाची भूमिका कशी साकारते. तितक्याच प्रभावीपणे तिला ही भूमिका साकारता येईल का? हे पाहण प्रेक्षकांकरता रंजक ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -