घरमुंबईफसवणूक प्रकरणी राहुल राज विरोधात गुन्हा दाखल

फसवणूक प्रकरणी राहुल राज विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचा पूर्व बाॅयफ्रेंड राहुल राज सिंग विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पार्टीच्या नावाने लोकांची फसवणूक केल्यामुळे ही तक्रार नोंदवण्या आली आहे.

बालिका वधू या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचा पूर्व बॉयफ्रेंड राहुल राज सिंग यांने लोकांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती मुंबई मिररद्वारे देण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पर्टीत गायक अंकित तिवारी याचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या नावावरून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचे कारणही राहुल राज सिंग असल्याचेही आरोप झाले होते.

‘या’ कारणामुळे दाखल करण्यात आला गुन्हा

नवीन वर्षाच्या औचित्यावर राहुल राज याने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. Oceanic New Year Blast असे या कार्यक्रमाचे नाव होते. या कार्यक्रमात गायक अंकित तिवारी येणार असल्याचे त्याने सांगितले होते. या पार्टीसाठी लोकांकडून ३ हजार ५०० रुपये लोकांकडून घेण्यात आले होते. पार्टी सुरु झाल्यानंतर गायक अंकित पार्टीत आला नाही. या मुळे भडकलेल्या प्रेक्षकांनी तोड फोड करण्यास सुरुवात केली. पैसे न मिळाल्यामुळे मी कार्यक्रमाला आलो नसल्याचे अंकितने सांगितले. या नंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात राहुल राज विरोधात फसवणूकीची तक्रार करण्यात आली.

- Advertisement -

हॉटेलद्वारे करण्यात आली तक्रार

राहुलने ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार केली आहे. राहुलने पार्टीमधून पळ काढल्यान भडकलेल्या लोकांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड केली. राहुलच्या कार्यक्रमामुळे हॉटेलच्या ८ लाख किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राहुलचे स्पष्टीकरण

दरम्यान राहुल राज ने या घटनेचं सर्व खापर हॉटेलवरच फोडले आहे. “मी ९०० लोकांसाठी हॉटेल बुक केले होते. अन्न व मद्याचे १८ लाख रुपये मी हॉटेलला दिले होते. पार्टी दरम्यान हॉटेल कर्मचाऱ्यांनी अन्न व मद्य देणे थांबवले होते. यामुळे लोकांनी हॉटेलची तोडफोड केली.” असे राहुलने सांगितले आहे.

- Advertisement -

राहुलने नुकतेच आपली गर्लफ्रेंड सलोनी शर्मा बरोबर लग्न केले आहे. १५ नोव्हेंबर रोजी या दोघांना कोर्ट मॅरेज केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -